कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील १६ जणांना तडीपारीच्या नोटीसा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधिल गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठलाच अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील ८ जणांनावर व तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ८ जणांनवर सोमवार दिनांक ८ सप्टेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या

असून कारवाईनंतर शहरात फिरतांना आढळल्यास संबंधित्वावर कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे शहरासह तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली असून सार्वजनिक गणेश मंडळे विविध कार्यक्रम व देखावे सादरीकरण करणारा असल्यामुळे व गणेश उत्सव शांततेत व धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी व लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी सर्व गणेश भक्त सज्ज झाले असून विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी मंडळाच्या वतीने अंतिम टप्प्यात पोहोचली आहे या मिरवणुकी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस व होमगार्ड पथक सज्ज झाले असून कुठेही शांततेचा भंग होणार नाही यासाठी स्थानिक गाव गुंडांचा शोध घेऊन त्यांना नोटिसा बजावण्यात आले आहेत एक पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या व राजकीय नेते कार्यकर्ते राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह इतरांना मिरवणूक होईपर्यंत १६ जणांना तडीपार करण्यात आले आहे

त्याबाबत त्यांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आले आहे गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणेश भक्तांची मोठी गर्दी असते त्या गर्दीचा फायदा घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही गावगुंड करतात त्या अनुषंगाने शहर पोलीस व तालुका पोलीसांची यंत्रणा सतर्क असून शांतता भंग करणारे तसेच गडबड गोंधळ केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.