Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

आ.आशुतोष काळे यांचा सोमवारी तहसील कार्यालयात जनता दरबार

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना महसूल आणि महावितरण विभागाबाबत येणाऱ्या विविध अडी-अडचणी समजून घेवून संबंधित कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत समक्षपणे चर्चा घडवून या अडीअडचणी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे सोमवार (दि.०८) रोजी सकाळी १०:३० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे मतदार संघातील बहुसंख्य नागरिकांचे अनेक शासकीय कार्यालयात विविध प्रकारची कामे असतात.

जाहिरात

त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा महिला, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी अशा सर्वच स्तरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात कामानिमित्ताने जावे लागते.शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक, महिला व जेष्ठ नागरिकांच्या समस्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांपुढे मांडून हे प्रश्न लवकरात लवकर कसे निकाली निघतील यासाठी आ.आशुतोष काळे यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी जनता दरबार हे उत्तम माध्यम असून आजपर्यंत अनेक नागरीकांच्या अडचणी जनता दरबाराच्या माध्यमातून सुटल्या आहेत.त्याच धर्तीवर सोमवार (दि.०८) रोजी आ.आशुतोष काळे यांनी पुन्हा महसूल आणि महावितरण विभागाशी संबंधित ज्या नागरिकांच्या अडीअडचणी आहेत

जाहिरात

अशा नागरीकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जनता दरबार आयोजित केला आहे. या जनता दरबारासाठी ज्या नागरीकांच्या अडचणी आहेत अशा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी व तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्यात. जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न निकाली निघतील यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »