Breaking
संजीवनी उद्योग समूह

कोपरगाव-शिर्डी औद्योगिक वसाहतीत प्रशिक्षण केंद्र उभारणी मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे यांच्या मागणीला यश

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी-शिर्डी परिसरात औद्योगिक विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले आहे. मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या विशेष मागणीला मंजुरी मिळून सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग या धर्तीवर टाटा टेक्नॉलॉजी संचलित अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीसाठी निधी प्राप्त झाला आहे. हा उपक्रम कोपरगाव-शिर्डी परिसरातील युवकांसाठी रोजगार आणि कौशल्यवृद्धीचे नवे दालन ठरणार आहे.अशा प्रकाराचे प्रशिक्षण केंद्र व्हावे यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी अनेकदा भूमिका मांडली होती तसा पाठपुरावा विवेकभैय्या कोल्हे आणि स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केला होता त्यास आलेले यश ही आनंदाची बाब ठरली आहे.या प्रशिक्षण केंद्राद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (A.I.), आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान, आणि स्टार्टअप संस्कृतीबाबत युवकांना प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्थानिक युवकांना उद्योगक्षेत्राशी थेट जोडून आत्मनिर्भरतेचा नवा आदर्श या केंद्रातून उभा राहील, असा विश्वास सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केला होता.स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दहा हजार स्वाक्षरी मोहीम राबवत सोनेवाडी शिर्डी एमआयडीसी केलेल्या मागणीमुळे मंजूर झाली त्यात युवकांना रोजगार मिळणे शक्य झाले आहे.यापूर्वी ‘डिफेन्स क्लस्टर’ प्रकल्पाला राज्य सरकारकडून मान्यता मिळालेली आहे. विमानतळ, समृद्धी महामार्ग, आधुनिक वाहतूक आणि निवास सुविधा यांमुळे या भागात देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणारे हे प्रशिक्षण केंद्र केवळ औद्योगिक विकासच नव्हे, तर स्थानिक उद्योग-व्यवसाय वृद्धिंगत करण्यास देखील हातभार लावणार आहे यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांनी सातत्याने भूमिका मांडली होती.राज्यात गेल्या काही महिन्यांत अनेक प्रशिक्षण केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, त्याच धर्तीवर सोनेवाडी शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीसाठी मंजूर झालेले हे केंद्र ठरणार आहे. या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे कोपरगाव-शिर्डी क्षेत्र नव्या औद्योगिक युगाचे प्रवेशद्वार ठरेल.या महत्वपूर्ण मागणीसाठी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देऊन मंजुरी दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री मा. उदय सामंत यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत, सौ. स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी या प्रशिक्षण केंद्रामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »