कोपरगांव शहरासाठी गोदावरी डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडा आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला असून नागरीकांना पाण्याची अडचण येवू नये यासाठी पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव भरून घेण्यासाठी गोदावरी डाव्या कालव्याद्वारे कोपरगाव शहरासाठी पाणी सोडा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या आहेत.आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील नागरीकांना नियमितपणे चार दिवसाआड नियमितपणे पाणी पुरवठा सुरु आहे. परंतु पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावांमध्ये काही दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यामुळे पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होवू शकतात.यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत व अजूनही कोपरगाव तालुक्यासह सर्वत्र परतीचा पाऊस सुरूच आहे. त्यामुळे सध्या तरी सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता नाही मात्र कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाल्यामुळे पाणी पुरवठा करण्यात व्यत्यय येवू शकतो.त्यामुळे कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तातडीने डाव्या कालव्याला पाणी सोडावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या आहेत.



