जनतेला लुटून खाणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा करणे हास्यस्पद – कुरेशी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
नगर मनमाड महामार्गावर पुणतांबा फाटा नजीक होणाऱ्या पुलाचे काम कोणत्या नेत्याच्या बगलबच्चाने तेथील कर्मचाऱ्यांना टक्केवारीसाठी धमकी देऊन मुलाच्या सुरू असलेल्या सांगाड्याचे काम बंद पाडले हे संपूर्ण शहराने पाहिले आहे. ज्यांचा पिंडच टक्केवारी गुंडगिरी आणि फसवेगिरीचा आहे त्यांनी गोदावरी नदीवरील पुलाचे फुकटचे श्रेय घेण्याचा बालीश प्रयत्न करणे हास्यस्पद आहे अशी जहरी टीका आमदार काळे यांचे नाव न घेता भाजपा अल्पसंख्याक सेलचे माजी अध्यक्ष खालीकभाई कुरेशी यांनी केली आहे.ज्याचे स्वतःअतिक्रमणावर घर बसले त्याने शहराच्या विकासाच्या गप्पा जोडणे आणि कोल्हे गटावर टीका करणे केविलवाना प्रयत्न आहे. नवाज कुरेशी यांनी काय दिवे आणि प्रताप लावले आहे हे नव्याने शहराला सांगण्याची गरज नाही.
नगर मनमाड महामार्गावरील नवीन पूल शासनाच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी कोल्हे गटाकडून झाली होती.नगर मनमाड रस्त्यासाठी कोल्हे यांनी वारंवार परखड भूमिका घेतली त्यानंतर काही प्रमाणात निधी मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी हालचाली केल्या मात्र संबंधित ठेकेदाराला दमबाजा करून काही मागण्या करून कोणी कामे खोळंबवली हे सर्वश्रुत आहे.
तुमच्या नेत्यांनी आजवर पवित्र कोणाची विटंबना झाली तेव्हा चकार शब्द तोंडातून काढला नाही तेव्हा तुम्ही मूग गिळून गप बसले होते का ?गोदावरी नदीच्या पुलाची भाषा केली त्यांना गोदावरी नदीवरील पहिला बंधारा माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी बांधला होता याची माहिती नसेल. हिंगणीचा बंधारा,खेडले झुंगे,सडे,शिंगवे यासह कित्येक गाव बंधारे यांची देखभाल दुरुस्ती देखील संजीवनी उद्योग समूह स्वखर्चाने करतो. जे स्वतः कवडीची झळ न घेता फक्त केंद्र शासनाच्या ही निधीचे श्रेय घेण्याचा दुगलबाज प्रयत्न करतात त्यांच्या बुद्धीची किव करावी वाटते.
गटारीवर अतिक्रमण करणारे शहराच्या विकासाचा किती शुद्ध विचार करू शकतात ? अशा लोकांची नावे वापरून काळे गटाला बातम्या देण्याची वेळ येणे यातच सारे काही आले असे खोचक टोलाही लगावला आहे.
काळे कुटुंबावर आमचे कार्यकर्ते टीका करताना एका विशिष्ट मर्यादेत आजवर बोलले पण खऱ्या अर्थाने ज्यांचा स्वीय सहाय्यक गुन्हा करून फरार आहे त्यांच्याकडून जनतेने कोणत्या विकासाच्या अपेक्षा करायच्या.शहरात अधिकारी असो अथवा ठेकेदार त्यांना कुणाच्या दहशतीत आणि कामाच्या मोबदल्यात काय करावे लागत होते हे अभ्यास चिंतनाचा विषय ठरेल त्यामुळे अधिकचे खोलात जाऊन बोलण्याची वेळ येऊ देऊ नका असा थेट इशाराही कुरेशी यांनी दिला आहे.




