१० वीचा निकाल उद्या दुपारी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
३. http://sscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
८. https://www.indiatoday.in/education-today/results
९. https://www.aajtak.in/education/board-exam-results
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-
१) ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाकिंत प्रतीसाठी बुधवार, दिनांक १४/०५/२०२५ ते बुधवार, दिनांक २८/०५/२०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.