जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांनी दिल्या आ.आशुतोष काळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोकणातील उल्हास खोऱ्यातील व वैतरणा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने उल्हास-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचा उद्घाटन समारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रविवार (दि.०३) रोजी सिंचन भवन नासिक येथे मंत्री महोदय तसेच आमदारांच्या व असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आ.आशुतोष काळे देखील उपस्थित होते.

सोमवार (दि.४) रोजी आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक कोपरगाव मतदार संघासह जिल्ह्यात व मुंबईत मंत्रालयासमोर देखील आ.आशुतोष काळे यांच्या कार्यकर्त्यांकडून व त्यांच्या हितचिंतकांकडून लावण्यात आले आहेत.आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस असल्याची माहिती जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मतदारसंघाच्या विकासासाठी देखील शुभेच्छा दिल्या.कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यामध्ये वळविणेबाबतचा महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या प्रकल्पामुळे अवर्षणप्रवण गोदावरी खोऱ्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होणार आहे.

यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री ना. छगनरावजी भुजबळ, अदिवासी कल्याण मंत्री ना.नरहरी झिरवळ, क्रीडा युवक कल्याण मंत्री ना.माणिकरावजी कोकाटे, खा. भास्करराव भगरे, आ. दिलीपकाका बनकर, आ.डॉ. राहुल आहेर, आ.राहुल ढिकले, आ.काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे,आ.अमोल खताळ यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी देखील आ.आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.