निवेदन दिल्याने किंवा प्रसिद्धी पत्रके देवून विकास कामे होत नाही -नंदकिशोर औताडे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
२०१९ पूर्वी झगडे फाटा-वडगाव पान फाटा तालुका हद्द (राज्य मार्ग-६५) या रस्त्याची झालेली दुरावस्था व नागरीकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी या रस्त्यासाठी १० कोटी निधी देवून हा रस्ता दुरुस्त केला परंतु सततच्या अवजड वाहतुकीचा भार व भक्कम पाया नसल्यामुळे हा रस्ता टिकाव धरू शकला नाही. त्यामुळे या रस्त्याचे कायम स्वरूपी पक्के काम होणे किती गरजेचे आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आ.आशुतोष काळे यांनी या रस्त्याचा प्रवास केला. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले. मात्र येवू घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही नेत्यांनी रस्त्यासाठी निवेदन दिल्याचे प्रसिद्धी पत्रक देवून श्रेय घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला. त्याला राष्ट्रवादी काँग्रसेचे कार्यकर्ते नंदकिशोर औताडे यांनी सडेतोड उत्तर देत निवेदन दिल्याचे प्रसिद्धी पत्रक देवून विकासकामे होत नसल्याची टीका औताडे गटावर केली आहे.नंदकिशोर औताडे यांनी असे म्हटले आहे की, आ.आशुतोष काळे यांना श्रेय घेण्याची नाही तर आपली जबाबदारी चोखपणे पार पाडायची आहे. त्यासाठी झगडे फाटा-वडगाव पान फाटा तालुका हद्द या रस्त्यासाठी निधी देवूनही हा रस्ता टिकत नसल्यामुळे या रस्त्याच्या दुरुतीचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी थेट विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधत लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केलेली आहे. कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर बाराही महिने मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. यामध्ये जड वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्याच्या वास्तव परिस्थितीची जाणीव व्हावी व या रस्त्यांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी या रस्त्याची झालेली दुर्दशा आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना दाखविली.रस्त्याची बिकट अवस्था पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने रस्ता दुरुतीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यामुळे या रस्त्यावर पडलेले खड्डे तात्पुरत्या स्वरुपात मुरूम टाकून बुजविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आ.आशुतोष काळे यावरच थांबणार नाहीत त्यांना या रस्त्याचे सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याप्रमाणे पक्के सिमेंट कॉंक्रीटचे काम करायचे आहे.मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध लागलेल्या स्वयंघोषित नेत्यांनी निवेदन दिल्याचे प्रसिद्धी पत्रक देवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे शेवटी नंदकिशोर औताडे यांनी म्हटले आहे.



