ब्रेकिंग

गौतम बँकेच्या सभासदांना दिवाळीपुर्वीच १५ टक्के दराने लांभाश

0 5 3 4 1 9

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

आपल्या अभ्यासु नेतृत्वातून मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला प्रगतीपथावर घेवून जाणाऱ्या आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रातील भक्कम नागरी बँक म्हणून गौतम सहकारी बँकेने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या भाग भांडवलावर सभासदांना दिवाळीपूर्वीच १५ टक्के लाभांश सभासदांच्या बँक खात्यात जमा केले असल्याची माहिती व्हा.चेअरमन बापुराव जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण पावडे व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली आहे.
व्हा. चेअरमन बापुराव जावळे यांनी सांगितले की, गौतम बँकेस सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात भरीव नफा झाल्यामुळे व आवश्यक त्या सर्व तरतुदी पूर्ण केल्यामुळे सभासदांना १५ टक्के दराने लाभांश वाटप करणेची शिफारस वार्षिक सर्वसाधारण सभेत केली होती. त्यास आम सभेने मान्यता दिल्यामुळे येणा-या दसरा व दिपावली सणाचे औचित्य साधुन सभासदांना आर्थीक मदतीचा हात म्हणुन बँकेच्या सभासदांना १५ टक्के लाभांशची रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे.बँकेचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची सभासदांना लाभांश देणे बाबत नेहमी तळमळ असे, आज साहेब असते तर त्यांना नक्कीच खूप आनंद वाटला असता, एंकदरीत बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असुन बँकेचा ऑडीट वर्ग “अ” आहे. बँकने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आर्थिक दृष्ट्या सक्षम बँक चे सर्व निकष पूर्ण केले आहेत. त्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांचे खंबीर नेतृत्व तसेच आ.आशुतोष काळे यांचे मार्गदर्शन कारणीभुत आहे.सभासदांचे बँकेतील बचत व चालू खाती लाभांश रक्कम वर्ग केलेली आहे. परंतु ज्या सभासदाचे बचत व चालू ठेव खाते निष्क्रिय आहे किंवा सभासद खात्याला ठेव खाते संलग्न नाही अशा सभासदांनी केवायसी कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबतचे आवाहन प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी केले आहे.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 1 9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे