कोपरगावच्या विकासाची दूरदृष्टी असणारा कार्यकर्ता म्हणजेच राजेंद्र दत्तात्रय सोनवणे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय चळवळीचा वारसा लाभलेले शहराच्या राजकारणात, सामाजिक कार्यात आणि लोकसेवेत सातत्याने कार्यरत असलेले नाव म्हणजे राजेंद्र दत्तात्रय सोनवणे उर्फ आर. डी. सोनवणे.जनतेच्या सुखदुःखात साथ देणारे तसेच मनाशी नातं जोडणारा, अहोरात्र झटणारा आणि “विकास हीच दिशा” मानणारा असा हा कार्यकर्ता आज कोपरगावच्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा पात्र ठरला आहे. शहराचा विकास साधताना माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब व आदरणीय बिपिन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना कोल्हे साहेबांचे ज्याप्रमाणे कोपरगावकरांवर प्रेम होते त्याचप्रमाणे कोपरगावचे व्हिजन डोळ्या समोर घेऊन नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काम करत असताना गोरगरिबांना न्याय देण्याचा नेहमीच माझा प्रयत्न राहिला आहे तसेच नागरिकांच्या अडचणींचं तत्काळ निराकरण आणि पारदर्शक कामकाज हीच त्यांची ओळख आहे. आर.डी.सोनवणे हे खेळाडू वृत्तीचे, शांत स्वभावाचे, संयमी पण ठाम निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील देखील उत्कृष्ट हॉलीबॉल पटू होते त्याच पावलावर पाऊल ठेवत राजेंद्र यांनी देखील शालेय जीवनात असताना व्हॉलीबॉल या खेळात कोपरगाव शहराचं नाव महाराष्ट्रभर गाजवलं आणि पुणे विद्यापीठाकडून सलग तीनदा मानाचं विजेतेपद मिळवलं.त्यांचे वडील स्वर्गिय डि.के.(अण्णा) सोनवणे हे देखील उत्कृष्ट खेळाडू वृत्तीचे आणि कोल्हे साहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून त्यांची एक ओळख आहे.

गोरगरीब जनतेसाठी त्यांनी सलग २५ वर्ष कोपरगाव शहरातील दत्त मंदिर परिसरात दिपावली निमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली “इंदिरा मिठाई फराळ” हे दुकान नफा-न-तोटा या तत्वावर चालवलं, ज्यात कुठलाही नफा नाही पण कोल्हे परिवाराचं नाव हे संपूर्ण तालुक्यात या सणानिमित्त व गोर गरिबांच्या सेवेसाठी कोल्हे परिवार तत्पर आहे हे यामधून कायम दिसून आले आणि आजही शहरातील नागरिक त्या ठिकाणी “डि के अण्णा”चं नाव सन्मानाने घेतात.त्यांच्यानंतर त्यांनी तीन पिढ्यांचा वारसा जपला असून आजही त्यांचे नातू विक्रांत राजेंद्र सोनवणे आणि सिद्धांत राजेंद्र सोनवणे हे देखील विवेक भैय्या कोल्हे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत.कोल्हे परिवाराचा कायम या परिवारावर मोठा आधार आणि आशीर्वाद राहिलेला आहे. तसेच आर.डी.सोनवणे यांच्या सुविद्य पत्नी विद्याताई सोनवणे यांनी देखील नगरसेवक पदाच्या कार्यकाळात आमदार सौ. स्नेहलताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह प्रभागातील अनेक विकासकामे राबवली,जी आजही चर्चेत आहेत.विद्याताई स्वतःही कोल्हे ताईंच्या सोबत सतत कार्यरत राहून समाजकार्यात सक्रिय भूमिका बजावत आहेत.सहकार महर्षी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या पासून सुरू झालेलं नातं आजही स्नेह,निष्ठा आणि विश्वासाने टिकून आहे.बिपिनदादा असोत,स्नेहलता ताई कोल्हे असोत किंवा विवेक भैय्या कोल्हे या सर्व कोल्हे परिवाराशी राजेंद्र दत्तात्रय सोनवणे यांचे अतूट संबंध आहेत.कोल्हे परिवाराच्या शहरातील राजकारणात,समाजकार्यात आणि सहकार चळवळीत एक विश्वासू,कार्यकर्ता म्हणून आर.डी यांना ओळखले जाते.२०११ च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र पाठक, अशोक लकारे, शिवाजी खांडेकर यांसारखे दिग्गज कार्यकर्ते कोल्हे परिवारात सामील करून पक्षाची ताकद वाढविण्यात राजेंद्र दत्तात्रय सोनवणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्या निवडणुकीत पक्षाचे बलाबल १३–१३ अशी स्थिती झाली असतांना सुरेखाताई राक्षे या नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या. तेव्हा गट नेते पदाची जबाबदारी सोनवणे यांनी अतिशय तारेवरची कसरत करत सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडले आणि पक्षाची एकजूट कायम राखली. त्यानंतर अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर कोल्हे साहेब आणि बिपीन दादांच्या विचाराने आणि मार्गदर्शनाने सौ.ऐश्वर्याताई सातभाई या नगराध्यक्ष झाल्या.आजपर्यंत सातभाई गट हा कोल्हे परिवाराचा दृढ सहकारी गट म्हणून दादा आणि भैय्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे. या संपूर्ण प्रवासात राजेंद्र सोनवणे यांनी संतुलन,संघटन आणि पक्षवाढीच्या दृष्टीने उल्लेखनीय भूमिका बजावली. कोपरगाव शहरात पक्ष बळकट करण्यासाठी आणि कोल्हे परिवाराचा गट अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचं योगदान मोठे आहे

तसेच २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत स्नेहलता ताई कोल्हे यांच्या प्रचारादरम्यान, कोपरगाव शहरातील अनेक राजकीय समीकरणं बदलून टाकण्याचं, विविध नेत्यांना एकत्र आणण्याचं आणि शहराच्या निवडणुकीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम ज्यांनी केलं, ते म्हणजेच आर. डी.सोनवणे.याशिवाय सोनवणे यांचं संघटन कौशल्य शहरभर प्रसिद्ध आहे.
गणेशोत्सव,सामाजिक उपक्रम किंवा कोणताही सार्वजनिक प्रसंग असो — विविध संघटना,मंडळं आणि तरुण कार्यकर्त्यांना कोल्हे परिवाराशी जोडून ठेवण्याचं कार्य त्यांनी सातत्याने केलं आहे.आजही तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वाधिक संघटन कौशल्य आणि संपर्काचे जाळं ज्यांच्याकडे आहे, ते म्हणजे आर.डी.तथा राजेंद्र दत्तात्रय सोनवणे.कोपरगाव नगरपरिषदेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने बिपिंनदादा कोल्हे माजी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे युवानेते विवेकभैय्या कोल्हे तसेच पक्ष पक्षश्रेष्ठींकडे ओबीसी प्रवर्गातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळावी यासाठी राजेंद्र दत्तात्रय सोनवणे यांनी विनम्रपणे विनंती केली आहे.
