कोपरगाव विधानसभेसाठी २० इच्छुकांनी केले ३० उमेदवारी अर्ज दाखल

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या आज मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या दिवसाअखेर २० इच्छुकांनी ३० उमेदवारी अर्ज दाखल केले, असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना दिली याबाबत सविस्तर वृत्त असे की आज अखेरच्या दिवसा पर्यंत अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आशुतोष आशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार), संदीप गोरक्षनाथ वर्पे (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार), शिवाजी पोपटराव कवडे (बळीराजा पार्टी), शंकर सुकदेव लासुरे (राष्ट्रीय समाज पक्ष), महेबुब खान पठाण (बहुजन समाज पक्ष), बाळासाहेब कारभारी जाधव (प्रहार जनशक्ती पार्टी), शकील बाबुभाई चोपदार (वंचित बहुजन आघाडी), प्रभाकर रावजी आहिरे (अपक्ष), संजय भास्करराव काळे (अपक्ष), विजय सुभाष भगत (अपक्ष), किरण मधुकर चांदगुडे (अपक्ष), विजय सुधाकर जाधव (अपक्ष), दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष), विजय नारायणराव वडांगळे (अपक्ष), चंद्रहंस अण्णासाहेब औताडे (अपक्ष), राजेंद्र माधवराव कोल्हे (अपक्ष), मनिषा राजेंद्र कोल्हे (अपक्ष), विश्वनाथ पांडुरंग वाघ (अपक्ष), खंडू गहिनीनाथ थोरात (अपक्ष) व किशोर मारोती पवार (अपक्ष) आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.