तहसील कार्यालय

कोपरगांव विधानसभा मतदारसंघात २७२ केंद्रांवर मतदान पथके रवाना

बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार कोपरगांव विधानसभा मतदारसंघात बुधवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २७२ केंद्रांवर होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथके पोलीस बंदोबस्तात रवाना झाली.मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंकी यांनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी,अशा सूचना श्रीम. सोळंकी यांनी केल्या.कोपरगांव विधानसभा मतदारसंघात १५३ ठिकाणी असलेल्या २७२ मतदान केंद्रावर १ हजार ६०० अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मतदान पथकांना सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल कोपरगाव येथे येथे उभारण्यात आलेल्या २६ टेबलच्या माध्यमातून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट सह मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.

२७ बसेस व २१ मिनीबस व ७ क्रुझर जीप मधून मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना झाले.याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, गटविकास अधिकारी संतोष राऊत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,चंद्रशेखर कुलथे, कोपरगांवचे मुख्याधिकारी सुहास जगताप,कोपरगांव ग्रामीणचे पोलीस निरिक्षक संदिप कोळी,कोपरगांव शहरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, आशिष शेळके आदी उपस्थित होते.

२१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूक लढवीत असून एकूण २ लाख ८९ हजार ६५६ इतके मतदार आहेत. यात १ लाख ४६ हजार ३३७ पुरूष मतदार आहेत. १ लाख ४३ हजार ३१३ स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथीय ६ मतदार आहेत. सेनादलातील ३०६ मतदार आहेत. मतदानादिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोलची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल.

मतदान प्रक्रियेत मतदारांना सहकार्य व्हावे म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची सुविधा असणार आहे. वेटींग रुम,पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत पुरवठा अदि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. एनएसएस व एनसीसीचे १८ वयापेक्षा कमी वयाच्या स्वयंसेवकांची नेमणूका करण्यात आल्या आहेत.सुमारे ४ सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रांवरील सुरक्षाकामी सुमारे ४०६ पोलीस कर्मचारी व ४०० केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल (सीएमपीएफ) च्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्यवस्थेकामी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिर्डी विधानसभेतील प्रत्येक बुथवर गरजेनुसार २ सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे ११ पथकांच्या माध्यमांतून पेट्रोलिंग केली जाणार आहे.मतदान केंद्रांच्या हालचालींवर बारीक लक्ष कोपरगाव विधानसभेतील २७२ मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्राचे लाईव्ह वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे.

 

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील पडद्यावर (स्क्रीनवर) ही लाईव्ह वेब कास्टिंगच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबर रोजी २०२४ रोजी सकाळी ५.३० वाजेपासून राखीव कर्मचाऱ्यांची टीम क्षणा – क्षणाला मतदान केंद्रावरील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहेत.मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जावू नये. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या २० नोव्हेंबर रोजी आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे, असे आवाहनही सायली सोळंके यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे