दिड दिवसानंतर रेस्क्यू टिमला संतोष तांगतोडे यांचा मृतदेह आला मिळून

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
दारणा धरणातून गोदावरी नदीला गुरुवार दिनांक २५ जुलै २०२४ रोजी पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटार व पाईप वाहून जाऊ नये यासाठी पाईप व विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी संतोष भिमाशंकर तांगतोडे (वय २५) हा काल पाण्यात उतरला असता पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने संतोष भिमाशंकर तांगतोडें हा तरुण पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना गुरुवारी घडली होती
त्या अनुषंगाने शोध कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते मात्र जास्त अंधार असल्यामुळे शोध कार्यास अडचणी येत असल्याच्या कारणाने शोध मोहीम स्थगित करून आज शुक्रवारी सकाळी बोटी द्वारे शोधमोहीम सुरु असतांना दुपारच्या सुमारासं मृतदेह हा तरंगून वरती आल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्ष्यात येताच त्यांनी तहसीलदार यांना कळवताच कोपरगाव नगरपदिषदेच्या रेस्क्यू टिमच्या बोटीद्वारे सदर मृतदेह बाहेर काढण्यात आला असून सदर तरुणाच्या मृत्यू मुळे मंजूर गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.