कोपरगाव नगरपरिषद सदस्य पदासाठी आरक्षण सोडत ८ ऑक्टोबरला आयोगाने केला कार्यक्रम जाहीर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव नगरपरिषदेच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला) अनुसूचित जमाती (महिला) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता तसेच सोडत काढण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यामध्ये बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयात आरक्षण सोडत होणार असून यामध्ये गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ ते मंगळवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ च्या दुपारी ०३.०० वाजेपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी असणार आहे या सूचना व हरकती मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावयाचे आहेत तसेच सूचना हरकती दाखल करणाऱ्या नागरिकांना आवश्यक असल्यास सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असे मुख्याधिकारी यांनी कळविले आहे तेव्हा या घोषणेमुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष आता ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोडतीकडे लागले आहे तसेच आपल्या प्रभागाचे आरक्षण काय निघणार यावर अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.