Breaking
महाराष्ट्र

प्रवरानगर देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

लोणी-प्रवरानगर परिसरातून महाराष्ट्रातला नाही तर देशाला सहकाराचा वारसा मिळाला. शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो हे या भूमीने दाखवून दिले. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकार क्षेत्रातील साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली.

जाहिरात

शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा,त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावेत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आयुष्य वेचलं आणि त्यांचा हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाड जपला. त्यांनी सहकार, शेतीपुरते कार्य मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेज, प्रवरा को-ऑपरेटिव्ह बँक,शैक्षणिक संस्था कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे.

जाहिरात

त्यानंतरही पुढील पिढीने हे कार्य पुढे नेल्याने आज लोणी-प्रवरानगर देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते. तसेच सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राची वेगाने वाटचाल सुरू आहे.जुन्या परंपरा आणि नवतंत्रज्ञान, नवसंशोधन याची सांगड घालण्याचा प्रयत्न होतं आहे. साखर उद्योगांमध्ये पारदर्शकता आणण्यासोबत इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यात आली आहे.

जाहिरात

त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे असे केंद्राचे प्रयत्न आहेत. सहकाराच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर होईल, महाराष्ट्र आत्मनिर्भर होईल यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे मदत मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »