तिघांना अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
शिर्डी पोलीस स्टेशन हददीतील प्रस्तावीत हददपार इसम नामे १) शरद गोटीराम फुलारी, रा.पोहेगांव ता. कोपरगांव तसेच कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन हददीतील इसम नामे २) कैलास देवराम कोळपे, राहणार. कोळपेवाडी ता.कोपरगांव ३) भारत अशोक दणके, रा.लक्ष्मीनगर शिर्डी, यांचे विरुद्ध प्रचलीत कायदयान्वये कारवाई करुनही त्यांचे गुन्हेगारी कृत्य सुरु असल्याने सदर इसमांविरुदध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ अन्वये हददपार प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता, सदर हददपार प्रस्तावांची मा.उपविभागीय अधिकारी यांचे आदेशान्वये आम्ही चौकशी करुन चौकशी अहवालाअंती मा.उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी भाग यांनी प्रस्तावीत हददपार इसमांबाबत आदेश पारीत केलेला आहे.१) भारत अशोक दणके, रा.लक्ष्मीनगर शिर्डी यास सहा महीन्यांकरीता अहिल्यानगर जिल्हा,तसेच नाशिक जिल्हयातील निफाड, सिन्नर, येवला, व छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वैजापुर या तालुका हददीचे बाहेर हददपार केलेले आहे.२) शरद गोटीराम फुलारी, रा. पोहेगांव ता. कोपरगांव यास दोन वर्षांकरीता अहिल्यानगर जिल्हा, तसेच नाशिक जिल्हयातील निफाड, सिन्नर, येवला, व छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वैजापुर या तालुका हददीचे बाहेर हददपार केलेले आहे.३) कैलास देवराम कोळपे, रा. कोळपेवाडी ता. कोपरगांव यास एक वर्षांकरीता अहिल्यानगर जिल्हा,

तसेच नाशिक जिल्हयातील निफाड, सिन्नर, येवला, व छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वैजापुर या तालुका हददीचे बाहेर हददपार केलेले आहे.तसेच उपविभागातील वारंवार गुन्हे करणारे १३ इसमांविरुदध हददपारीची चौकशी सुरु आहे. तसेच यापुढे देखील शिर्डी उपविभागातील २ किंवा २ पेक्षा अधिकचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी टोळयांवर हददपारीची कारवाई सुरु असुन हददपारीचे आदेश झालेले असतांना तसेच हददपारीची कार्यवाही सुरु असतांनाही हददपार आदेशाचा भंग करुन पुन्हा गुन्हे करणारे इसमांविरुदध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले,औषधीद्रव्य गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालनेबाबतचा अधिनियम सन १९८१ (एमपीडीए) तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोका) अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.