सर्व महामानवांच्या पुतळ्यांची कोपरगाव शहरात आज केली स्वच्छता

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष वैभव आढाव व त्यांच्या सर्व मित्र परिवाराने ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शहरातील विविध महापुरुष व राष्ट्रपुरुषांचे स्मारके

असून या स्मारकांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजाला मिळत असते त्या अनुषंगाने पुतळ्यांची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे
याबाबत कोपरगाव नगरपरिषदेच्या उद्यान विभागाने याबाबत गांभीर्याने उपाययोजना करून सर्व पुतळ्यांची नियमित स्वच्छता करावी किंवा परिसरातही दैनंदिन साफसफाई होईल याची दक्षता घेणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे कोपरगाव शहराध्यक्ष वैभव सुधाकर आढाव व त्यांच्या मित्र परिवाराने दोन दिवसांवर १५ ऑगस्ट हा ७९ वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्या मध्ये आपले जीवन झोकून देणाऱ्या
सर्व महापुरुषांचे व राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांचे बुधवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी कोपरगाव शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कोपरगाव शहराध्यक्ष वैभव आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ सोमासे अभिषेक आढाव निलेश बोराडे
राकेश डोंगरे बाळासाहेब लकारे रोहित आढाव हर्षल नरोडे फकीर मोहम्मद पैलवान देविदास बागुल अजय जगदाळे हर्षल जोशी दिपक मैदंड विक्रांत कुदळे प्रणव आमले देवेंद्र डोंगरे साई शेळके कार्तिक अंबोरे अथर्व बैरागी कार्तिक नरोडे साई जोशी अनिल इंगळे कृष्णा सोनवणे या सर्वांनी आपले योगदान दिले.