भारतीय बौध्द महासभेच्या अहिल्यानगर उत्तर विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हा अहिल्यानगर उत्तर विभागाच्या वतीने शिर्डी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन बुधवार दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की जागतिक बौध्दांचे श्रध्दास्थान व जेथे भगवान बुध्दांना बुध्दत्व प्राप्त झाले. त्या बुध्दगयातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे (१८९१) चे आद्य प्रणेते अनागरीक धम्मपाल यांच्या जयंती निमित्त तसेच दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाबोधी महाविहार बोधगया मुक्तीभूमी. महू जन्मभुमी आणि नागपुर दिक्षाभुमीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि बुध्दिस्ट सोसाटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तसेच भिक्खु संघ. समता सैनिक दल व आंबेडकरी बहुजन समाजाच्या समविचारी संस्था / संघटनेच्या वतीने शिर्डी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात १७ सप्टेंबर २०२५ रोजी जन आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः स्थापन केलेली बौध्दांची मातृसंस्था दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्या वतीने डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी मा.सर्वोच्च न्यायालयात इंटरवेंशन याचीका दि. ०२/०८/२०२५ रोजी दाखल केली आहे. या अस्मीतेच्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी भारतीय बौध्द महासभा अहिल्यानगर जिल्हा उत्तर शाखेसह तालुका शाखा, शहर शाखा, वार्ड शाखा, ग्रामशाखा पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक / शिक्षिका, बौध्दाचार्य /बौध्दाचार्या मा.श्रामणेर सर्व पुरूष / महिला पदाधिकारी व सैनिक, उपासक / उपासिका आपणास आवाहन करण्यात येते की,अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम बौध्द बांधवांनी या जन आक्रोश आंदोलन मध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन अहिल्यानगर उत्तर जिल्हा अध्यक्ष शांताराम रणशूर यांनी केले आहे.
टीप – आंदोलनाची सुरुवात शिर्डी समाज मंदिरा पासून शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय पिंपळवाडी रोड शिर्डी येथे जाणार आहे तेव्हा सर्वांनी शिर्डी येथील समाज मंदीर येथे जमावे.