प्रा.कोठावदे व प्रा.मलिक यांचे सेट परीक्षेत घवघवीत यश

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे एस. एन. डी. शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. रामकृष्ण कोठावदे व प्रा. कैलास मलिक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्राध्यापक पात्रता म्हणजेच सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात घवघवीत यश संपादन केले आहे.प्रा. कोठावदे यांनी 226 गुण व प्रा. मलिक यांनी 240 गुण मिळवून सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.या यशाबद्दल नर्मदा बचाव आंदोलनाच्या सर्वेसर्वा मेधाताई पाटकर, नाशिक विभागीय शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे, जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र भाऊ दराडे, संचालक रुपेश भाऊ दराडे, सिद्धांत भाऊ दराडे व सर्व संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, सुनील पवार व प्रसाद गुब्बी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत भड, श्रीरामपूर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नान्नर सर, कार्यालयीन अधीक्षक थळकर व सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.