बस थांब्या बाबत कोपरगाव मनसेच्या पाठपुराव्याला अखेर यश

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोपरगाव बस आगाराच्या हद्दीत येणाऱ्या साईबाबा कॉर्नर व बेट नाका या ठिकाणी बस थांबा मिळावा यासाठी कोपरगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १८ ऑगस्ट रोजी कोपरगावचे आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांना बस थांबा मिळावा व तेथे बोर्ड लावण्यात यावा त्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले होते सदर निवेदन अहिल्यानगरचे विभाग नियंत्रण यांनी सदर शिर्डी कोपरगाव मार्गावरील बेट नाका व साईबाबा कॉर्नर येथे विनंती थांबा फलक लावण्याबाबत मनसेने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन त्वरित मागण्या मान्य करून सदर ठिकाणी त्वरित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोपरगाव आगाराच्यावतीने साईबाबा कॉर्नर व बेट नाका येथे फलक लावले असून या विनंती फलक थांब्याचे पूजन ४ सप्टेंबर रोजी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे तसेच

आगाराचे व्यवस्थापक अमोल बनकर मनसेचे पदाधिकारी बापू काकडे अनिल गाडे बाळासाहेब खैरनार रवींद्र झावरे प्रमोद आरण अबजत सय्यद भैय्या सुपेकर सचिन खैरे छोटू पठाण नवनाथ मोहिते संजय जाधव अनिकेत खैरे अनिकेत दवंगे सुरेश सुपेकर गुंजाळ भाऊ अनिल सुपेकर आदींच्या उपस्थितीत साईबाबा कॉर्नर व बेट नाका येथील फलकाचे अनावरण सोहळा संपन्न झाला तसेच बस स्थानकावर प्रवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी व प्रवाशांच्या सुरक्षेते साठी बस स्थानक व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा व शौचालये स्वच्छ ठेवणे बाबत मनसैनिकांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत बस आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार मनसेने केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने अखेर यश आले असून याबाबत स्थानिक नागरिकांनी कोपरगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.