कोपरगाव तालुक्यातील ३ जि.प.प्रा.शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना दरवर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो मात्र २०२३ पासून हे पुरस्कार जाहीर झाले होते मात्र ते पुरस्कार त्या गुणवंत शिक्षकांना देण्यात आले नव्हते त्यामुळे आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त २०२३-२०२४-२०२५ या तीनही वर्षाचे एकत्रित पुरस्कार वितरण आज अहिल्यानगर येथील कल्याण रोड वरील द्वारका लॉन्स येथे सकाळी १० वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच स्थानिक खासदार व आमदार यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील माध्यमिक विभागाच्या संध्या गायकवाड व योजना विभागाचे बाळासाहेब बुगे यांच्या उपस्थितीत २०२३ मधील आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सचिन भीमराव अढांगळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगणापूर तसेच २०२४ चे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते पितांबर मखमल पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारी तसे २०२५ चे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते मंगला साहेबराव गोपाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे (वस्ती नवीन) पोहेगाव या आदर्श शिक्षक पुरस्कारर्थीचा पुरस्कार वितरण सोहळा वरील मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे

दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व केंद्रप्रमुख यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते या प्रक्रियेसाठी शिक्षक व केंद्रप्रमुख यांची १०० गुणांची प्रश्नावली अद्यावत करून जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. तसेच यामध्ये सहभागी होऊन इच्छिणाऱ्या शिक्षक व केंद्र प्रमुखांनी आपापल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये स्वयं मूल्यमापन करून प्रश्नावली जमा केली त्या प्रस्तावाची तालुका गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी होऊन तो अहवाल जिल्हा कार्यालयात पाठवण्यात येतो त्यानंतर जिल्हा स्तरावरून गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्याकडून इतर तालुक्यातील एक पथक त्या प्रस्तावाचं निरीक्षण व परीक्षण करते त्यानंतर सदर प्रस्ताव प्राप्त शिक्षक यांची २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीची बैठक होऊन पथकाकडून प्राप्त १०० गुणांची प्रश्नावली व लेखी परीक्षेचे २५ गुण असे एकूण १२५ गुणां पैकी ज्यांना सर्वात जास्त गुण मिळाले अशा शिक्षकांचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येतो त्यानंतर सदर पुरस्काराची घोषणा करण्यात येऊन शिक्षक दिनानिमित्त त्या शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात येतो.