आ.आशुतोष काळेंच्या उपस्थितीत लौकीतील कोल्हे गटाच्या १७ कुटुंबाचा काळे गटात प्रवेश

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
मागील २५ वर्ष चुकीच्या मार्गावर होतो परंतु आम्हाला आता चांगली बुद्धी सुचली. मदतीच्या अपेक्षेने ज्यावेळी सुदामा आपला मित्र भगवान श्री कृष्णाकडे गेले होते त्यावेळी ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याला भरभरून दिले तसाच काहीसा अनुभव आम्हाला आ.आशुतोष काळे यांच्या बाबतीत आला. ज्या रस्त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो जो आजपर्यंत कधीच झाला नव्हता त्यावेळी त्यांनी आम्ही विरोधी गटाचे आहोत हे नाही पाहिले पण आम्ही मतदार संघातील आहोत आणि आम्हाला रस्त्याची अडचण आहे
आ.आशुतोष काळेंच्या कार्यकाळात सर्वात जास्त निधी लौकी गावाला मिळाला. कोळ नदी उकरण्यासाठी नकार देणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराला आ.आशुतोष काळे यांनी एकाच फोनवर कोळ नदी उकरायला लावली. लौकी गाव एका विशिष्ट कुटुंबाचा बालेकिल्ला होता परंतु आमची जेवढी मागणी होती त्यापेक्षा जास्त मिळाले. त्यामुळे तुम्ही केलेल्या विकास कामातून आपोआप अनेक माणसं काळे गटाशी जोडली जाणार आहेत-राजेंद्र खिलारी(राष्ट्रवादी कार्यकर्ते)
हे पाहिले आणि रस्त्याबाबत जेवढी अपेक्षा घेवून गेलो होतो त्यापेक्षा जास्त चांगला रस्ता करून मिळाला असल्याचे सांगत कोपरगाव तालुक्यातील लौकी येथील कोल्हे गटाच्या १७ कुटुंबांनी एकाच वेळी आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत काळे गटात अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. येवू घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे गटाला मोठे भगदाड पडले असून आ.आशुतोष काळे यांचे पारडे कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात अधिकच जड झाले आहे.कोपरगाव तालुक्यातील लौकी गावात शुक्रवार (दि.१०) रोजी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कोल्हे गटाच्या १७ कुटुंबांनी एकाचवेळी कोल्हे गटाची साथ सोडून आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना आ.आशुतोष काळेंनी सांगितले की, विकासकामे करतांना कधीच भेदभाव केला नाही आणि करणार पण नाही. नेहमीच सर्व सामान्य जनतेचा विचार करतो, प्रलोभन दाखविणे हा माझा स्वभाव नाही जे ठरवलं ते करतोच.
पन्नास वर्षात आमच्या रस्त्यावर आमच्या वस्तीवर चार चाकी गाडी येऊ शकत नव्हती ती चार चाकी गाडी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या रस्त्यामुळे आता आमच्या वस्तीवर येत आहे या नागरिकांच्या हृदयापासूनच्या आमदारांप्रती भावना आहेत. पाट पाण्याच्या प्रश्नासाठी मराठवाडा एकत्र होऊन लढत असताना एका बाजूने आ.आशुतोष काळे आपल्यासाठी लढत आहे. गजर गाड्याचा निवद शेंगोळ्याचा हे आम्ही यापूर्वी तालुक्यात अनुभवले आहे. खुनशी राजकारण कार्यकर्त्यांना संपवण्याचे षडयंत्र हे प्रकार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्यापासूनच काळे गटात नाही.-शिवाजी ठाकरे (राष्ट्रवादी कार्यकर्ते)
जिल्हा परिषद अध्यक्ष. नगराध्यक्ष. पंचायत समिती सभापती आणि कोपरगाव शहरातील प्रभागाचे आरक्षण जाहीर झाले आहे व सोमवारी गट आणि गणाचे आरक्षण देखील जाहीर होणार आहे. त्यामुळे येणारा काळ जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा बँक, ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ आहे त्या दृष्टीने तयारीला लागावे.मागील पाच वर्षात झालेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचली आहे व यापुढील काळातही विकास कामांचा झंझावात असाच सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कोल्हे गटाचे यशवंत कदम, सुभाष कदम, ज्ञानेश्वर कदम, दादासाहेब कदम, बापू कदम, ज्ञानेश्वर कदम, शंकर बोर्डे, भाऊसाहेब कोटकर, अनिल पवार, मधुकर खंडीझोड, शुभम खंडीझोड, रतन सोनवणे, सचिन भवर, संजय खंडीझोड, प्रतीक कदम, किरण कदम यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव बोरनारे, माजी संचालक बाळासाहेब बारहाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, शिवाजीराव ठाकरे, प्रकाश शिंदे, राजेंद्र माने, विक्रम सिनगर, भारत चौधरी, गुलाबराव वल्टे, शिवाजीराव शेळके, संदीप शिंदे, बाबासाहेब शिंदे, कानिफनाथ गुंजाळ, विजयराव टूपके, सुधाकर वादे, बद्रीनाथ जाधव, अंजीराम खटकाळे,दिगंबर जाधव, राजेंद्र खिलारी, सावळीराम खटकाळे, सागर खटकाळे आदींसह पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.