आ.आशुतोष काळे व सहकाऱ्यांनी तळमळीने केलेल्या कामाची पावती रयतच्या उत्तर विभागाला प्रा.डॉ.एन.डी.पाटील आदर्श विभाग पुरस्कार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेबांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे विश्वासाने दिलेली रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची जबाबदारी सांभाळतांना उच्च शिक्षित असलेल्या आ.आशुतोष काळे यांनी हि जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. आपल्या नेतृत्व गुणातून त्यांनी व सहकाऱ्यांनी तळमळीने केलेल्या कामातून उत्तर विभाग मागील पाच वर्षात सर्वच क्षेत्रात नंबर एकवर राहिला आहे.
रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारधारेवर चालणारी संस्था असून संस्थेच्या कार्यामध्ये सामाजिक समतेसह गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जातो. याच तत्वांना अनुसरून उत्तर विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली. रयत शिक्षण संस्थेसाठी तनमनधनाने काम करणे हि काळे परिवाराची परंपरा आहे. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्यानंतर मा.आ.अशोकराव काळे यांनी देखील नेहमीच रयत शिक्षण संस्थेसाठी मोठे योगदान दिले आहे. काळे परिवाराचा हा वारसा पुढे चालवितांना उत्तर विभागाचा अध्यक्ष या नात्याने केल्लेल्या प्रामाणिक कामातून सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने उत्तर विभागाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच उत्तर विभागाला प्रा.डॉ.एन.डी.पाटील आदर्श विभाग पुरस्कार मिळाला याचा मनस्वी आनंद आहे. या पुरस्कारामागे उत्तर विभागाच्या सर्वच घटकांचे योगदान आहे.यापुढील काळातही सर्व रयत सेवकांच्या सहकार्याने हि यशस्वी घौडदौड अशीच सुरु राहील-आ.आशुतोष काळे.
त्यांच्या या उल्लेखनीय कामाची दखल घेवून रयत शिक्षण संस्थेने उत्तर विभागाचा प्रा.डॉ.एन.डी.पाटील आदर्श विभाग पुरस्कार देवून गौरव केला आहे.शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे एकूण पाच विभाग आहे.मध्य विभाग सर्वात मोठा असून त्यानंतर उत्तर विभागाचा नंबर लागतो. या उत्तर विभागासाठी कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर शंकररावजी काळे, दादा पाटील, बाबुराव भापकर,आण्णासाहेब शिंदे,पी.बी.कडू पा.,भास्करराव गलांडे यांनी उत्तर विभागात रयत शिक्षण संस्थेचा सर्वाधिक विस्तार केलेला आहे. मागील पाच वर्षापासून आ.आशुतोष काळे यांच्याकडे उत्तर विभागाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

तेव्हापासून त्यांनी आपल्या उच्च शिक्षणाच्या अनुभवातून रयत शिक्षण संस्थेसाठी तळमळीने आणि तनमनधनाने काम करतांना रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या व शाखेच्या गुणात्मक आणि संख्यात्मक विकासासाठी सातत्त्याने विविध शैक्षणिक प्रयोग राबविले. उत्तर विभागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक विकास अशा अनेक महत्वपूर्ण बाबींमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीने उत्तर विभागाला सर्वच बाबतीत अव्वल स्थानावर नेवून ठेवले

त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत उत्तर विभागाचा कळस चढला आहे.आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी व गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत मागील पाच वर्षापासून उत्तर विभागाने सातत्याने मोठे यश मिळविले आहे. हा पुरस्कार उत्तर विभागाच्या एकंदर कार्यक्षमता, शैक्षणिक गुणवत्ता, समाजाभिमुख उपक्रम आणि संघटनात्मक प्रभावीपणाच्या मूल्यांकनावर आधारित असून उत्तर विभागाने यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली असून पाचही वर्षात उत्तर विभाग गुणवत्ता,भौतिक सुविधा,कृत्रिम बुद्धिमत्ता,डिजिटल बोर्ड या सर्व नवीन धोरणांना प्रभावीपणे राबवून सर्वच आघाड्यांवर अग्रभागी आहे. याची संस्थेने दखल घेवून शनिवार (दि.०४) रोजी सातारा येथे झालेल्या १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तर विभागाला संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते व्हा.चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख,

सौ.मीनाताई जगधने, दादाभाऊ कळमकर, मा.आ.राहुल जगताप, प्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजीत भालेराव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेचे मा.चेअरमन प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या नावाने दिला जाणारा ‘प्रा.डॉ.एन.डी.पाटील’ आदर्श विभाग पुरस्कार प्रदान करण्यात आला. आ.आशुतोष काळे आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत उत्तर विभागाच्या वतीने उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, कार्यालयीन प्रमुख राजनारायण पांडूळे,भीमराज रोहकले,नितीन बारगळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.