केंद्रीय गृहमंत्री तथा देशाचे पहिले केंद्रीय सहकारमंत्री ना. अमितजी शाह यांचे आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
केंद्रीय गृहमंत्री तथा पहिले केंद्रीय सहकारमंत्री ना.अमितजी शाह यांचे रविवार (दि.०५) रोजी लोणी व कोपरगाव येथे विविध कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

त्यांचे शनिवार (दि.०४) रोजी श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.तसेच सदर कार्यक्रमांसाठी ना.अमितजी शाह यांचे समवेत पूर्व संध्येला शनिवार (दि.०४) रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस,

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री ना. मुरलीधरजी मोहोळ, महसूलमंत्री ना.चंद्रशेखरजी बावनकुळे, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना.सौ.पंकजाताई मुंडे,

जलसंपदा मंत्री ना. गिरीशजी महाजन, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांचे देखील आगमन झाले असता त्यांचेही कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने आ.आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत केले.