एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कु.उषाताई पवार यांना पोलीस दलातील डी.वाय.एस.पी पदावर नियुक्ती

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कु.उषाताई पवार यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवून डी.वाय.एस.पी पदावर नियुक्ती मिळवली आहे.२००६ ते २०११ या कालावधीत उषाताईनी एस.एस.जी.एम. महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. खडतर परिस्थितीतून जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.या यशाबद्दल महाविद्यालयात आयोजित सुयश प्राप्ती कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ॲड.संदीप वर्पे यांनी उषाताई पवारानी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर यश प्राप्त करून महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली असल्याचे म्हटले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.माधवराव सरोदे होते त्यांनी नवनियुक्त उषाताईंचा सत्कार करून अभिनंदन केले.

ते म्हणाले की उषाताईंचे यश हे केवळ वैयक्तिक नसून महाविद्यालयासाठी आणि कोपरगाव शहरासाठीही अभिमानाची बाब आहे.” तसेच महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. भगीरथ काका शिंदे व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ बंडेराव तऱ्हाळ यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.सुनिता अत्रे यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत यांनी मानले. या प्रसंगी ज्युनियर विभागाचे प्रा. कळमकर,अधीक्षक सुनील गोसावी उपस्थित होते.




