एस.एस.जी.एम. कॉलेजमधील प्रयोगशाळा परिचर किरण आढाव यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या, एस. एस. जी. एम. कॉलेजमधील प्रयोगशाळा परिचर किरण आढाव हे नियत वयोमानाप्रमाणे व शासकीय नियमाने ३० सप्टेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. किरण आढाव यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले; तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ज्ञानेश्वर वाघचौरे हे होते.

महाविद्यालय सेवक कल्याण समितीच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कारमूर्तींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी, “रसायनशास्त्र सारख्या विषयात ४० वर्षे कार्य करणे सोपे नव्हे, ते कार्य वाखाणण्यासारखे आहे. असे सांगून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी,प्रथम प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यालयीन सेवक ही शिक्षकांबरोबरच महत्त्वाचे असते त्यामुळे या सेवकांची उणीव सातत्याने भासत राहते. असे सांगून किरण आढाव यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या मान्यवरांबरोबरच प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ, डॉ. प्रतिभा रांधवणे, बाळासाहेब साळवे, सौ.अनिता आढाव यांनी सत्कारमूर्तींच्या आठवणींना उजाळा दिला.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शाखांचे उपप्राचार्य, सौ.आढाव, किरण आढाव यांच्या मातो श्री आप्तेष्ट, मित्रपरिवार यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय सेवक कल्याण समितीचे चेअरमन,सदस्य व आयोजकांनी केले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. अर्जुन भागवत यांनी करून दिला. प्रा. डॉ. सीमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार ग्रंथपाल चंद्रशेखर खैरनार यांनी मानले.