शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपली नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी- काका कोयटे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
व्यक्तिगत टिका टिपणीत आपल्याला स्वारस्य नाही. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करीत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार अशोक काळे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या पाठबळावर आपण शहराचा विकास करू. आपल्या पत्नी सुहासिनी कोयटे या नगराध्यक्ष असतानाच्या काळात झालेली विकासकामे जनतेसमोर आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांनी आपली भूमिका माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.ते म्हणाले, आपल्या पत्नी सुहासिनी कोयटे नगराध्यक्ष असताना कोपरगावमधील बेट, खडकी आणि लक्ष्मी नगर परिसर या भागात पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या.
काका कोयटे हे राजकारणापासून काही काळ दूर होतो. तरीही कोपरगाव बसस्थानकाचे सुशोभीकरण, वृक्ष लागवड, माणुसकीचे मंदिर स्थापन करून गरजूंसाठी कपडे, पादत्राणे, औषधांचे वितरण यांसारखे उपक्रम सातत्याने राबवीले. शहरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास मंदिर उभारले त्यात १९० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुविधा उपलब्ध आहे. सहकार मंदिर उभारून महिलांना अगरबत्ती, धूप, वाती आदी उत्पादन प्रशिक्षण दिले. उत्पादनांची विक्री व्यवस्था निर्माण केली.
ओपनथेटर जवळील शॉपिंग सेंटर, नेहरू भाजी मार्केट जवळील शॉपिंग सेंटर, बसस्थानका जवळील शॉपिंग सेंटर, शाळा क्र.१ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या मागील शॉपिंग सेंटर विविध ठिकाणी व्यापारी संकुले उभारली.ही व्यापारी संकुले उभारताना एकाही मुळ दुकानदाराला विस्थापित न करता त्यांनाच जागा उपलब्ध करून दिल्या. साई सिटी परिसरात त्यांनी उभारलेले योग मंदिर आणि आरोग्य मंदिर हे आरोग्यवर्धक उपक्रम शहरवासियांना भावले आहे. निवारा वसाहतीसह महादेव मंदिर परिसर, हनुमान मंदिर परिसर, गणेश मंदिर परिसर, जगदंबा मंदिर परिसर या ठिकाणचे ओपन स्पेस विकसित करून सुशोभीकरण केले. समता उद्यान, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असे विविध उपक्रम तेथे राबवीले.




