आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या १.८० कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या १.८० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत कोपरगावकरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या १.८० कोटींच्या निधीतून कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे ०१ कोटी निधीतून भव्य व्यापारी संकुल बांधण्यात येणार असून ८० लाख रुपये निधीतून गुरु शुक्राचार्य मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. कोपरगाव शहरातील नागरीकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आजवर कोपरगाव शहराच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. नागरिकांच्या सोयी सुविधा आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात त्यामुळे मागील सहा वर्षात कोपरगाव शहराला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे.आ.आशुतोष काळे यांना विकसित शहर म्हणून कोपरगावची नवी ओळख निर्माण करायची आहे. विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहराला जिल्ह्यात नंबर एकवर घेवून जायचे असून त्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे. मिटलेला पाणी प्रश्न, रस्त्यांचा झालेला विकास अशा सर्व विकास कामांमुळे कोपरगाव शहराचे रूप बदलले आहे.आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून कोपरगाव शहरात विकास कामांबरोबरच त्यांनी व्यापारी संकुल उभारण्यावर भर देवून व्यापार विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल टाकले आहे. कोपरगाव बस स्थानक लगत सुरु असलेल्या व्यापारी संकुलाचे काम अंतिम टप्यात आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या लगत साडे तीन कोटीच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन होवून काम सुरु झाले आहे. या एक कोटीच्या व्यापारी संकुलाच्या भूमिपूजन झाल्यामुळे लवकरच हे काम देखील सुरु होवून हि व्यापारी संकुले शहराच्या विकासात अधिकची भर घालणार असून त्यामुळे बाजारपेठ फुलण्यास निश्चितपणे मदत होणार आहे.गुरु शुक्राचार्य मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी दिलेल्या ८० लाख रुपये निधीतून अधिकच्या सोयी सुविधा जगभरातून येणाऱ्या भाविकांना उपलब्ध होणार आहे तसेच गुरु शुक्राचार्य मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर भाविकांच्या स्वागतासाठी गुरु शुक्राचार्य असा नामोल्लेख असणारी सुसज्ज स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. त्याबद्दल राष्ट्रवादीचे पदाधिकारी सचिन परदेशी यांनी या भूमिपूजन प्रसंगी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. या भूमिपूजन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी, माजी नगरसेवक व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




