Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष, नगरसेवक निवडून द्या पुढची जबाबदारी माझी-आ.आशुतोष काळे

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून कोपरगाव शहराचा विकास साधला आहे. आता येणाऱ्या नगरपरीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या पुढची जबाबदारी माझी असे सूचक विधान करून आ.आशुतोष काळे यांनी नगरपरीषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.कोपरगावकरांसाठी आ.आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आ.आशुतोष काळे प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवार (दि.२७) रोजी कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे हजारो कोपरगावकरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.

आ.आशुतोष काळे यांनी केवळ विकासकामेच केले नाही, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून त्यांनी महिला भगिनीच्या डोक्यावरचं वर्षानुवर्षाच ओझं उतरवलं आहे. हे अतिशय पुण्याचे काम त्यांनी केले असून हा खरा खुरा महिलांचा सन्मान आहे. आम्ही नायक-नायिका आहोत पण पडद्यावरचे. मात्र खरे नायक आ.आशुतोष काळे आहेत जे आपल्या तालुक्यात आपल्या गावात आपल्या माणसांसाठी काम करतात.-अभिनेत्री तेजश्री प्रधान.

या कार्यक्रमासाठी ‘अगं बाई सासूबाई फेम’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान,‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग व कोपरगावची रील स्टार राशी शिंदे उपस्थित होत्या.यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू न देता मतदार संघातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली त्याप्रमाणे कोपरगावकरांना देखील दिलेला शब्द पूर्ण केला आहे त्यामुळे २०१९ पूर्वी २३ दिवसांनी नळाला येणारे पाणी आता चार दिवसांनी येत आहे. परंतु आपल्याला यावरच थांबायचे नाही हे पाणी नियमित कसे देता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक शहरांचा विकास झाला असून हि शहरं विकासाच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे निघून गेली आहे. मात्र आपल्या कोपरगाव शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही त्यासाठी नगरपालिकेची सत्ता अत्यंत महत्वाची आहे. रस्ते, गटारी हे प्रश्न सुटणारच आहेत परंतु कोपरगाव शहराची बाजारपेठ इतर शहराच्या बरोबरीने फुलवायची असेल तर अजून व्यापारी संकुल उभारावी लागणार आहे. कोपरगाव शहराच्या लगत असलेल्या जिल्हा उद्योग केंद्र, डेअरी पोल्ट्री अँड ब्रिडिंग फार्म व अॅग्रीकल्चर कोपरगांव कॅटल ब्रिडिंग सेंटर फार्मच्या मालकीच्या जागेवर एमआयडीसी उभारून कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला अधिकची चालना कशी देता येईल अशा अनेक विकासाच्या माझ्या संकल्पना आहेत.

आ.आशुतोष काळे हे फक्त लोकप्रतिनिधीच नाहीत तर ते संवेदनशील माणूस पण आहेत. जीव घेण्या संकटात त्यांनी दाखवून दिलं की, नेतृत्व म्हणजे फक्त बोलणं नाही, तर दुःखातही जनतेला हात धरून पुन्हा उभं करणं म्हणजे नेतृत्व आहे.-अभिनेत्री प्राजक्ता घाग.

या संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी मला आपले आशीर्वाद आवश्यक आहे. ज्याप्रमाणे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून देवून राज्यात क्रमांक पाचचे सर्वाधिक मताधिक्य दिले. त्याचप्रमाणे येणाऱ्या नगरपरीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या यापेक्षाही जास्त निधी कोपरगाव शहरासाठी आणू अशी ग्वाही दिली. यावेळी आ.आशुतोष काळे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, प्राजक्ता घाग, रील स्टार राशी शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेच्या विजेत्यांना होंडा ऍक्टिव्हासह दहा आकर्षक बक्षीसांचे वितरण व उत्तेजनार्थ बक्षीसे म्हणून ०५ पैठणी साड्यांचे बक्षीसे देण्यात आली.याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »