Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

कोपरगावकरांसाठी आ.आशुतोष काळे प्रश्नमंजुषा स्पर्धा ;विजेत्यांना होंडा अॅक्टिवासह अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

आ.आशुतोष काळे मित्र मंडळातर्फे कोपरगावकरांसाठी आ.आशुतोष काळे प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघासह कोपरगाव शहरात केलेल्या विकास कामांवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेत होंडा अॅक्टिवा सह विजेत्यांना अनेक बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.माजी खासदार स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या विचारांचा वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे घेऊन जात असतांना आ.आशुतोष काळे यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. कोपरगाव मतदारसंघाबरोबरच कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल उपजिल्हा रुग्णालय, सावळीविहीर कोपरगाव रस्ता, शहरातील रस्ते, शहर सुशोभीकरण असे अनेक प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी मागील सहा वर्षात सोडवून दाखविले आहे. त्यामुळे कोपरगाव शहराची बाजार पेठ पुन्हा फुलण्यास मदत झाली आहे. याच विकास कामांवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा असणार आहे.हि स्पर्धा फक्त कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी असून या स्पर्धेसाठीची प्रश्नपत्रिका कोपरगाव शहरातील नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घरपोहच देण्यात आली आहे. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन सोडविलेली प्रश्नपत्रिका रविवार (दि.२६) रोजी सायं.६ वाजेपर्यंत स्पर्धकांनी आ.आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे.या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसांची ठेवण्यात आली आहे. यामध्ये प्रथम बक्षीस-होंडा अॅक्टिवा, द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवे बक्षीस पिठाची गिरणी, सहावे बक्षीस कुलर, सातवे बक्षीस शिलाई मशीन, आठवे बक्षीस ओव्हन, नववे बक्षीस प्रेशर कुकर व दहावे बक्षीस मिक्सर ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा पूर्णतः विनामूल्य असून स्पर्धेतील विजेते लकी ड्रॉ पद्धतीने निवडण्यात येणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवार (दि.२७) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे करण्यात येणार आहे.कोपरगाव शहरातील नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ.आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »