सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याच्या अपूर्ण कामावरून आ.आशुतोष काळेंनी ठेकेदाराला सुनावले

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
एन.एच.७५२ जी या राष्ट्रीय महामार्गावरील सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम अंतिम टप्यात असून राहिलेले काम अतिशय धीम्या गतीने सुरु असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. रविवार (दि.२६) रोजी अशीच वाहतूक कोंडी झाली असता संवत्सर वरून अंत्यविधी आटोपून येत असलेल्या आ.आशुतोष काळे यांनी पुणतांबा फाटा येथे झालेली वाहतूक कोंडी पाहून त्याचवेळी या रस्त्याच्या ठेकेदाराला भ्रमणध्वनीवरून चांगलेच सुनावले. तो व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून ठेकेदाराबाबत आ.आशुतोष काळेंनी घेतलेल्या कडक भूमिकेचे स्वागत केले आहे.शांत, संयमी स्वभाव अशी आ.आशुतोष काळे यांची ओळख ते कधीही कुणावर रागावलेले कधीही कोणी पहिले नाही. परंतु ज्या सावळीविहीर कोपरगाव रस्त्याचा काही दशकापासून प्रश्न प्रलंबित होता त्या रस्त्याला आ.आशुतोष काळे यांनी १९१ कोटी निधी आणून या रस्त्याचे काम अंतिम टप्यात आहे.
अहिल्यानगरकडे शिर्डीवरून जाणारी अवजड वाहतूक नियमितपणे पुणतांबा फाटा मार्गे वळविण्यात आली आहे व सातत्याने पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचत असून पुणतांबा फाटा येथे वाहतूक कोडी होते.परंतु भू-संपादनाच्या बाबतीत काही नागरीकांच्या व्यक्तिगत अडचणीमुळे जर रस्त्याच्या कामात व्यत्यय येत असेल तर त्याबाबत माझ्याशी संपर्क करा मात्र यापुढे या रस्त्याचे काम थांबता कामा नये-आ.आशुतोष काळे
त्याच रस्त्यावर रविवार (दि.२६) रोजी पुणतांबा फाटा येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यामुळे या रस्त्याच्या ठेकेदारावर आ.आशुतोष काळे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. धीम्या गतीने सुरु असलेले रस्त्याचे काम व सातत्याने अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना करावी लागणारी कसरत पाहून क्रोधायमान झालेल्या आ.आशुतोष काळे यांनी आपल्या वाहनातून उतरून त्याच ठिकाणाहून सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला चांगलेच खडे बोल सुनावल्याचे सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे व्हिडीओतून दिसत आहे. काम धीम्या गतीने का सुरु आहे? जलद गतीने काम करण्यात तुम्हाला काय अडचणी आहेत त्या मला सांगा? तुमच्या अडचणी सोडविण्यास मी खंबीर आहे पण काम शीघ्र गतीने झाले पाहिजे.सावळीविहीर फाट्यापासून पुणतांबा फाट्या पर्यंत दोन्ही बाजूने सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वाहतूक कोंडीची अडचण येत नाही. परंतु पुणतांबा फाटा व बेट नाका या ठिकाणी या रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळेच अडचणी येत असून नागरीकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी ठेकेदाराला फटकारत उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरीकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या कठोर शब्दात सूचना दिल्या.



