भारतीय बौध्द महासभेची राहाता तालुका कार्यकारिणी जाहीर

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
भारतीय बौध्द महासभा अहिल्यानगर उत्तर विभागाची राहाता तालुका कार्यकारणी पुनर्गठन बैठक अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री गौरव पवार यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर व सरचिटणीस नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक व राहाता प्रभारी भीमराव कदम प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष गौतम पगारे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष अतिष त्रिभुवन हिशोब तपासणी विजय जगताप नेवासा प्रभारी रमेश निकम कोपरगाव प्रभारी बिपीन गायकवाड यांच्या उपस्थितीत राहाता तालुका व शहर पुनर्गठन बैठकीचे आयोजन रविवार दि.२६ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय बौध्द विहार चितळी रोड राहाता या ठिकाणी केले होते यावेळी जिल्हा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून उपस्थित भंन्ते महामोगलायन यांनी उपस्थित सर्वांना त्रिशरण पंचशील दिले त्यानंतर मागील कार्यकारिणीचा कार्य अहवाल माजी राहाता तालुका सरचिटणीस संदीप त्रिभुवन यांनी सादर केल्यानंतर सदरची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी ती बरखास्त करून शांताराम रणशूर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित तालुका पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया संस्थेच्या बायोलॉज प्रमाणे लोकशाही पद्धतीने सर्वांचे फार्म भरून निवड प्रक्रिया घेण्यात आली त्यानुसार गौतम गोडगे (तालुका अध्यक्ष) रमेश जाधव (सरचिटणीस) बाबासाहेब पगारे (कोषाध्यक्ष) सुशांत पवार (उपाध्यक्ष संस्कार विभाग) भाऊसाहेब निकम (उपाध्यक्ष संरक्षण) योगेश डोखे (संघटक) निवृत्ती सोनवणे (संघटक) मोगल बनसोडे (संघटक) सुधाकर सूर्यवंशी (संघटक) अनिकेत गायकवाड (संघटक) स्वप्निल मगरे (संघटक) यांची निवड प्रक्रिया जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली त्यानंतर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संस्थेच्या कामकाजा विषयी माहिती देऊन सर्वांनी एकत्रितपणे संस्थेच्या व धम्मकार्याच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच १६ डिसेंबरच्या हरेगाव कार्यक्रमासाठी सर्वांनी तयारीला लागा असेही संकेत देऊन निवड झालेल्या सर्वांचे गुलाब फुलाचे गुच्छ देऊन अभिनंदन केले त्यानंतर भीमराव कदम विजय जगताप बिपीन गायकवाड गौतम पगारे रमेश निकम आतिश त्रिभुवन या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्याला शुभेच्छा देत असतांना म्हणाले की सर्वांनी एकजुटीने एक दिलाने संस्थेच्या कुठल्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी तसेच संस्थेच्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करून दिलेले काम अथवा जबाबदारी सर्वांनी पूर्णत्वाकडे न्यावे असे रणशूर शेवटी आपल्या मनोगतात म्हणाले तसेच सर्व जिल्हा कार्यकारणी यांनी नवनिर्वाचित राहाता तालुका कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिपिन गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार भीमराव कदम यांनी मानले.




