बुध्द धम्म प्रसारक मंडळ ट्रस्टच्या वतीने वर्षावास सांगता पर्व समारंभाचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
अखिल भारतीय भिक्खु संघ प्रणित बुध्द धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने वर्षावास सांगता पर्व समारंभाचे आयोजन शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी कोपरगाव शहरातील नगर मनमाड रोड गोदावरी नदी पुलाजवळी लुंबिनी उपवन बुध्दविहार या ठिकाणी पूजनीय भिक्खु अभयपुत्र महाथेरो,पुजनीय.भंन्ते रेवत तिस्स,पुज.भंन्ते.पदुम तिस्स,पुज.भंन्ते.अभिजित तिस्स,पुज.भंन्ते.बुध्दालोक तिस्स,पुज.संघरंसि.अय्याजी,पुज.धम्मरंसि.अय्याजी आदी भिक्खु भिक्खुनी संघाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर येथील एस.सी एस.टी आयोगाचे डेप्युटी कमिशनर आयु.प्रदीपजी पोळ यांच्या उपस्थितीत वर्षावास सांगता पर्व समारंभ संपन्न होणार आहे यामध्ये सकाळी १०.०० ते १०.३० वाजेच्या दरम्यान धम्म ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर १०.३० ते ११.०० वाजता महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्रिशरण पंचशील व बुध्द गुणांचे पठण होईल त्यानंतर ११.०० ते १२.०० वाजता भिक्खु संघाचे भोजन तसेच उपस्थित उपासक व उपासिकांचे स्नेहभोजन होईल त्यानंतर दुपारी १२.०० वाजता पुजनिय भिक्खु संघाची धम्मदेसना होणार आहे तेव्हा जास्तीत जास्त उपासक-उपासिकांनी या धम्म देसणा श्रवण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बुध्द धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे आलेल्या सर्व उपासक उपासिकांसाठी भोजनाचे आयोजन आयुष्यमती सखुबाई निवृत्ती जाधव व आयुष्यमान निवृत्ती रामचंद्र जाधव ईशान्यनगर कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.