भारतीय बौध्द महासभा उत्तर विभागाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे नेवासा तालुक्यातील गावांना भेटी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्या अहिल्यानगर उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर सरचिटणीस नरेंद्र पवार कोषाध्यक्ष नानासाहेब बनकर संरक्षण सचिव अण्णासाहेब जगताप जिल्हा संघटक व कोपरगाव प्रभारी बिपिन गायकवाड माजी सरचिटणीस अशोक बोरुडे नेवासा तालुकाध्यक्ष भगवान दादा दळवी आदी पदाधिकाऱ्यांनी रविवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा, सुरेशनगर, मुकिंदपुर आणि पुनदगाव या सह अनेक गावांना भेटी देऊन तेथील स्थानिक बुद्ध विहारात उपासक व उपासिका यांच्याशी भेटून संवाद साधून तेथील बौध्द विहारांमध्ये तथागत भगवान गौतम बुध्द व महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प दिप धूप प्रज्वलित करून पूजन करण्यात आले याप्रसंगी पुनदगावचे स्थानिक उपासक रवींद्र वाघमारे सुधाकर लांडगे बापूसाहेब वाघमारे रघुनाथ लांडगे भाऊसाहेब वाघमारे बाळासाहेब वाघमारे कचरू वाघमारे सुभाष लांडगे संजय वाघमारे सयाजी वाघमारे राहुल लांडगे मायकल कांबळे अरुण हिवाळे समीर वाघमारे निखिल साळवे सिद्धार्थ लांडगे आदी उपासक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित उपासकांना दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा या संस्थेबाबत माहिती देण्यात देऊन त्या त्या गावांमध्ये जास्तीत जास्त उपासक व उपासिका तसेच तरुणांसाठी समता सैनिक दलाचे जवान तयार करण्याबाबत सविस्तर माहिती देऊन लवकरच नेवासा तालुका नेवासा शहर व ग्रामीण शाखा पुनर्गठन करून ही निवड प्रक्रिया पूर्ण करून कार्यकर्ता शिबिर व श्रामनेर शिबिर तसेच समता सैनिक दलाचे शिबिराचे आयोजन करण्यात बाबत नियोजन करण्या बाबत माहिती देण्यात आली असून तेव्हा नेवासा तालुक्यातील बौध्द उपासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच ज्यांना भारतीय बौध्द महासभेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी नेवासा तालुक्यातील आदर्श बौध्दाचार्य व अहिल्यानगर उत्तर विभागाचे जिल्हा संरक्षण विभागाचे सचिव अण्णासाहेब जगताप यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या गावांची व उपासकांची माहिती द्यावी व या धम्म प्रचारासाठी आपण सज्ज व्हावे असे आवाहन अहिल्यानगर उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी भेटी प्रसंगी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.