Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करा आणि पंधरा दिवसात कार्यवाहीचा अहवाल सादर करा-आ.आशुतोष काळे

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी वेळेत सुटल्या पाहिजेत. सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलणे योग्य नाही. अडचणी घेवून येणाऱ्या नागरीकांचे प्रश्न समजावून घेवून त्यांचे प्रश्न सोडवा एकाच कामासाठी त्यांना वारंवार चकरा मारायला लावू नका. जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करा आणि पंधरा दिवसात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी महसूल विभाग व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.कोपरगाव मतदार संघातील नागरिकांच्या महसूल विभाग व महावितरण कंपनी ह्या विभागांतील समस्या सोडवण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.०८) रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे ‘जनता दरबार’ पार पडला.यावेळी या जनता दरबारामध्ये महावितरण संदर्भात कमी क्षमतेने होणारा वीज पुरवठा, लोंबकळत असलेल्या वीज वाहिन्या, खंडित वीजपुरवठा, नवीन वीज रोहित्र मागणी, नवीन स्मार्ट वीज मीटर बसविणे, वीज बीलातील त्रुटी तसेच महसूल विभागाच्या बाबत महसूल नोंदी, शिवार रस्ते, उत्पन्न प्रमाणपत्रे, ७/१२ उतारे, पोट खराबा, रेशन, अशा अनेक बाबतीत नागरीकांनी आपल्या व्यथा आ.आशुतोष काळे यांच्यापुढे मांडल्या.त्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी समजावून घेत आ.आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरीकांचे प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले.यावेळी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना सूचना करतांना आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की, प्रशासन जनतेसाठी आहे, जनता प्रशासनासाठी नाही त्यामुळे जनतेच्या समस्या सुटल्याच पाहिजेत.

जाहिरात

जनता दरबारात नागरीकांनी मांडलेल्या प्रश्नांवर पंधरा दिवसांमध्ये कारवाई होणे अपेक्षित आहे.याची महसूल व महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. तहसील कार्यालयात एजंटचा सुळसुळाट वाढला असून नागरीकांची अडवणूक करून शासकीय कामासाठी पैसे मागितले जातात अशा नागरीकांच्या तक्रारी आहेत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. याबाबत सखोल चौकशी करून जो कोणी कर्मचारी अशा प्रकरणात दोषी असेल त्याला समजावूनन सांगा आणि वेळप्रसंगी त्याच्यावर कार्यवाही करा अशा सूचना तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या. यापुढे जर नागरीकांची अडवणूक करून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आले तर मला दर आठवड्याला जनता दरबार घ्यावा लागेल त्यावेळी जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर होणारी कारवाई कोणीच थांबवू शकणार नाही असा सज्जड ईशारा आ.आशुतोष काळे यांनी महसूल प्रशासनाला दिला.महावितरण संदर्भात अनेक वीज ग्राहकांच्या तक्रारी आहेत या समस्या देखील सुटल्या पाहिजे. महावितरण कडून जुन्या वीज मीटरच्या जागी वीज ग्राहकांना नवीन स्मार्ट वीज मीटर बसवत आहे. त्याबाबत नागरीकांमध्ये संभ्रम असून तो संभ्रम महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दूर करावा. वीज ग्राहकाशी सुसंवाद साधून व सहमती घेवूनच स्मार्ट मीटर बसवावे अशा सूचना केल्या. जनतेच्या समस्या वेळेवर न सुटल्यामुळे त्यांना प्रशासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. म्हणूनच प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी जनता दरबार घेत आहे. प्रशासन आणि मतदार संघातील नागरिक यांच्यातील अंतर कमी करून कोणत्याही शासकीय कार्यालयात नागरीकांची कामे अडली जावू नये हेच माझं ध्येय आहे.

जाहिरात

त्यासाठी प्रशासनाने देखील ‘जनसेवा हीच, आपली खरी जबाबदारी’ आहे असे समजून सहकार्याची भूमिका घेवून नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर कसे मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करावे.जनता दरबारात नागरीकांनी लेखी स्वरूपात मांडलेल्या सर्व अडचणींचे निराकरण व्हावे यासाठी हे सर्व अर्ज संबंधित विभागाकडे पाठविले जातील त्यावर पंधराच दिवसात कार्यवाही झाली पाहिजे. पुढच्या जनता दरबारात तुम्हाला याबाबत अगोदर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा लागेल हे लक्षात घ्यावे असा सूचक ईशारा आ.आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित महसूल विभाग व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार सौ.प्रफुल्लिता सातपुते, भूमी अभिलेख अधीक्षक रमाकांत डावरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता सौ. रंजना फरसाळे, धनंजय धांडे आदींसह शासकीय कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »