सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या बळवंत ढोमसेची कुस्ती स्पर्धेत कास्य पदकाची कमाई

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
ऑलिंपिक गेम असोसिएशन कर्नाटक यांचे वतीने दिनांक २५ व २६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या एम.ए.च्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी बळवंत शरद ढोमसे याने कास्य पदक मिळविले असल्याची माहिती प्र.प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली आहे.ऑलिंपिक गेम असोसिएशन कर्नाटक येथे पार पडलेल्या ऑल इंडिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत बळवंत ढोमसे याने सहभागी होवून ६१ किलो वजन गटात कुस्तीच्या उत्कृष्ट डावपेचातून कास्य पदक पटकाविले आहे. दि.११ ते दि.१४ नोव्हेंबर २०२५ रोजी उझबेकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.बळवंत ढोमसे याने मिळविलेल्या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे,उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, सर्व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे, महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बळवंत ढोमसे यास महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.राजेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.



