Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

कोपरगाव तालुक्याला मिळाली ३१.७० कोटींची नुकसान भरपाई

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून त्याचा फटका संपूर्ण कोपरगाव मतदार संघाला देखील बसला होता. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भर पावसात पाहणी करून आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देवून पंचनाम्याबाबत दाखविलेल्या दक्षतेमुळे कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३१.७० कोटीची नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आली असून हि नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. तसेच सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोपरगाव मतदार संघात शनिवार (दि.२७) रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्र रूप धारण करून शेतीचे अतोनात नुकसान केले होते. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन,बाजरी,कापूस,मका, तूर, भाजीपाला, फळ पिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी भर पावसात आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करत मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने व तातडीने करून त्याचा अहवाल लवकरात लवकर वरिष्ठांकडे सादर करण्याच्या सूचना महसूल आणि कृषी विभागाला दिल्या होत्या.मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांची आ.आशुतोष काळे यांनी भेट घेवून मतदार संघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती देवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरीकांना जास्तीत जास्त मदत द्यावी असे साकडे घातले होते.

आसमानी संकट शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुंजली असली तरी संकटाच्या काळात शासनाचा प्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे अत्यंत गरजेचे असते.सहा वर्षापूर्वी राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त तालुके जाहीर करून कोपरगाव तालुक्याच्या चोहूबाजूच्या सिन्नर, वैजापूर, राहाता आदी तालुक्यांच्या सर्व गावांचा सामावेश करतांना कोपरगाव तालुक्यातील बोटावर मोजण्याइतक्याच गावांचा दुष्काळी गावात समावेश केला होता.परंतु मागील सहा वर्षात हि परिस्थिती पूर्णपणे बदलली असून ज्या ज्या वेळी मतदार संघातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आली त्या-त्यावेळी आ.आशुतोष काळे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची समाधानकारक मदत कशी मिळवून देता येईल यासाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजवर झालेल्या नैसर्गिक आपत्तीची शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळाली व याहीवेळी झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे होवून मिळणाऱ्या मदतीमुळे बळीराजा पुन्हा मोठ्या हिमतीने उभा राहणार आहे.

नुकसानीच्या पंचनाम्याबाबत शेतकरी व नागरीकांच्या असलेल्या तक्रारींची दखल घेवून तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी संदीप दळवी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहणार नाही यासाठी योग्य पद्धतीने अचूक पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.या सर्व एकत्रित प्रयत्नातून कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात येवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३१.७० कोटीची नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यात सुरुवात झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्याही बँक खात्यात लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी आधार मिळणार आहे. रब्बी हंगामाच्या उभारणीला आर्थिक बळ मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करून ३१.७० कोटीची नुकसान भरपाई दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, कृषी मंत्री ना.दत्तामामा भरणे, मदत व पुनवर्सनमंत्री ना.मकरंदजी पाटील यांचे कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »