महाराष्ट्र

गोदावरी नदी पात्रात मंजूर येथील तरुण बेपत्ता प्रशासनाच्या वतीने शोधकार्य सुरु

0 5 3 4 1 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

दारणा धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी व पाईप वाहून जाऊन नये यासाठी पाईप व विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी कारवाडी -हंडेवाडी येथील शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे हा २५ वर्षीय तरुण नदीमध्ये मोटार काढण्या साठी गेला असता पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने संतोष भिमाशंकर तांगतोडें पाण्यात वाहात गेल्याने बेपत्ता झाला असून सध्या नदी मध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असून देखील शोध कार्य सुरू असल्याचे कोपरगावचे तहसीलदार संदिपकुमार भोसले यांनी सांगितले आहे या बाबत सविस्तर वृत्त असे की हंडेवाडी -मंजूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईपचा मंजूर बंधारा असून या पुलाजवळ शेतकरी संतोष भिमाशंकर तांगतोडे (वय २५) ,अमोल भिमाशंकर तांगतोडे,(वय ३०),प्रदिप भिमाशंकर तांगतोडे (वय २८), व नारायण भिकाजी तांगतोडे (वय ५२) हे गोदावरी नदीला पाणी येणार असल्याने नदीकाठी असलेल्या विहिरी वरील मोटारी काढण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज नआल्याने संतोष वाहत चालल्याचे नदी किनारी शेळी चारण्यासाठी उभ्या असलेल्या ताईबाई छबुराव पवार व छबुराव बाबूराव पवार यांच्या लक्षात येताच ताईबाई पवार यांनी आपली स्वतःची नेसलेली साडी सोडून तरूणांच्या दिशेने फेकून त्यातील अमोल व प्रदीप यां दोघांना आधार देऊन वाचवण्यात त्यांना यश आले मात्र त्यात संतोष हा तरुण पाण्याच्या वाढत्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही क्षेत्रामध्ये पुरूषांच्या तुलनेत महिला कुठे कमी नसल्याचे मुर्तीमंत उदाहरणं आज ताईबाई छबुराव पवार या महिलेने आपल्या जिवाची पर्वा न करता स्वतःची साडी सोडून तरूणांच्या दिशेने फेकून पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या दोघांना त्यांनी आधार देऊन पाण्याच्या बाहेर काढून जीवदान दिले त्यामुळे त्या विरमाता आहे – संदीप कुमार भोसले तहसीलदार कोपरगाव

त्यानंतर प्रशासनाच्या वतीने शोधकार्य सुरू केले.मात्र अमोल व प्रदिप हे त्या पाण्यामध्ये गुदमरले होते त्यांना पाण्याबाहेर घेऊन छाती दाबून उलटे करून पोटातील पाणी काढून त्यांना पुढिल उपचारासाठी कोपरगाव येथे हॉस्पिटलला पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे तसेच पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या तरुणाच्या शोधासाठी प्रशासना कडून शोधमोहीम सुरू आहे.मात्र संध्याकाळी उशिरा पर्यंत कुठलाही ठाव ठिकाणा लागू शकला नाही.या शोध मोहीमे मध्ये कोपरगाव नगरपरिषदेचे आरोग्य विभाग व फायर ब्रिगेडचे प्रमुख सुनील आरण,यांच्या मार्गदर्शनाखाली जवान सागर काटे,धनंजय शिनगर, प्रशांत शिंदे,आकाश नरोडे, घनश्याम कुर्हे व संजय विधाते हे या शोध मोहीमेत असून तहसीलदार संदिपकुमार भोसले,नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,मंडळाधिकारी नानासाहेब जावळे,तलाठी दिपाली विधाते,तलाठी दिनकर कातकडे हे घटनास्थळी उपस्थित असून शोध घेण्यासाठी परिश्रम घेत असून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते मात्र अंधार पडल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहे तरी देखील शोधमोहीम सुरूआहे.मात्र याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्वरित सोमनाथ तांगतोडे 90 60 64 28 66 यांच्या दिलेल्या नंबरवर संपर्क करावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे