श्रमिक मजदुर संघाच्या लढ्याला यश शालेय पोषण आहार कामगाराच्या मानधनात १ हजार रुपयांची वाढ

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
भारतात सर्वात कमी पगारावर काम करणारे कर्मचारी म्हणजे शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचारी होय. ही योजना सन २००३ सालापासून सुरु झाली आहे.सुरुवातीला फक्त ३०० रुपये दरमहा इतके मानधन दिले जात होते.नंतर ते मानधन वाढून ५०० रुपये केले.त्यानंतर १००० रुपये नंतर १५०० आणि शेवटी २५०० रुपये तुटपुंजे मानधन दिले जात आहे.सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना यांनी वेळोवेळी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर मोर्चे,आंदोलन,निवेदन देवून एक लोक चळवळ उभारली आहे.
संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचारी यांना शासकीय सेवेत जो पर्यंत सामावुन घेत नाही तो पर्यंत १५००० रुपये मानधन द्या अशी प्रमुख मागणी केली आहे. हिवाळी आणि पावसाळी अधिवेशनात मान.शिक्षण मंत्री व मान.मुख्यमंत्री यांना भेटून निवेदन देवून मानधन वाढविण्याची मागणी केली होती. ती मागणी काही अंशी मान्य करून १ हजार रुपयाने मानधन वाढीचा निर्णय ५ जुलै २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे आपल्या इतर मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही तो पर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांनी सांगितले आहे.
या लढ्यात संघटनेचे राज्य समन्वयक सौ.सविता विधाते,सुभाष सोनवणे, उत्तम गायकवाड,कैलास पवार,कावेरी साबळे, शितल दळवी तसेच राज्य उपाध्यक्ष कविता धिवारे तसेच सर्व तालुका व जिल्हा कार्यकारिणी व तमाम सभासद यांनी मोलाची साथ दिली आहे.