श्रमिक मजदुर संघाच्या शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यासाठी १ दिवसीय धरणे व निषेध आंदोलन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संपूर्ण देशभरात सर्वांत कमी पगारावर काम करणारा वर्ग म्हणजे शालेय पोषण आहार कर्मचारी होय अगदी तुटपुंज्या अर्थात फक्त २५००/-रुपये इतक्या कमी मानधनावर हे कर्मचारी सध्या काम करत आहेत.हे काम करत असतांना या कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे श्रीरामपूर तालुक्यामध्ये १६ वर्ष फक्त ३०० रुपये महिन्यांपासून ज्या महिलांनी कामे केली अन् त्यांच महिलांना अचानक कामावरून काढून टाकले एका बाजूने सरकार महिलांचा सन्मान करत आहे आणि दुसऱ्या बाजूला महिलांना हाताला काम नसल्यामुळे बेघर करत आहेत आणि त्यांचें काम हे शासनाचे अधिकारी एका खाजगी ठेकेदाराकडून हे काम करून घेत आहे त्यामुळे या महिलांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे सध्या या प्रशासनाने १३ माध्यमिक शाळा मिळून एक ठेकेदार नेमला आहे.ठेकेदार कुठेतरी फक्त साधी खिचडी तयार करून वाटत आहे.यात शासनाचे सर्व नियम या खाजगी ठेकेदारांनी धाब्यावर बसविले आले आहे.कोरडा माल शाळेतून बाहेर घेऊन जातो आणि शिजविलेले माल शाळेत घेऊन येतो हे कशे असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे म्हणून ही पद्धत बंद करून पूर्वी प्रमाणे शाळेतच आहार शिजवावा आणि या साठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे यासाठी सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघाच्या श्रीरामपूर शाखेच्या वतीने पंचायत समिती श्रीरामपूर येथे एक दिवसीय धरणे व निषेध आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.यावेळी राज्य समन्वयक सुभाष सोनवणे,तालुका अध्यक्ष कावेरी साबळे,शोभा वमने,
मेहेरूनिसा शहा,सुनीता वाघमारे,ज्योती क्षीरसागर
,सुनीता हळनोर,भावना वेताळ,संगीता वेताळ,
सुनीता खेमनर,कांता राशीनकर,आशा साठे, कमल सातपुते,विजया शिंगटे आदी महिला कर्मचारी उपस्थित होत्या.या प्रसंगी विविध संघटनेच्या प्रतिनिधी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.मनसे जिल्हा अध्यक्ष बाबा शिंदे,
समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष जोएफ जमादार, बीजेपी चे नेते प्रकाश चित्ते,सामाजिक कार्यकर्ते अशोक बागुल यांनी पाठिंबा दिला.तालुक्याचे आमदार लहू कानडे यांच्या वतीने अशोक कानडे यांनी आंदोलन करत्यांची भेट घेऊन तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी सामलेटी मॅडम आणि आंदोलनकर्ते यांची भेट घडवून आणली व पंधरा दिवसात प्रश्न सुटला नाही तर मीही तुमच्या सोबत आंदोलनाला बसेल असे सांगितले.यावेळी कार्यालयाच्या वतीने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना अंतिम कारणे दाखवा नोटीस दिल्याचे लेखी पत्र गटशिक्षण अधिकारी सामलेटी यांनी आंदोलनकर्त्यांनां दिले आहे.