अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील वेळापूर कारवाडी रस्त्याने बापू त्रिंबक माळी वय 45 हे पायी जात असतांना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर व्यक्ती गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असून ही घटना सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली असून सदर अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजून 39 मिनिटांनी सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोपरगाव तालुका पोलिसांनी सदर अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर कलम 399/2024 बी.एन.एस 2023 चे कलम 106 (1) 281,125 (बी) 324 (4) मोटार व्हेईकल ॲक्ट 184,134 (अ) (ब) प्रमाणे दाखल केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बापू त्रिंबक माळी वय 45 राहणार कारवाडी तालुका कोपरगाव हे त्यांच्या पत्नी व मुलांना भेटून वेळापूर येथून कारवाडी येथे रस्त्याने पायी येत असताना ब्राह्मण नाल्याजवळ वेळापूर शिवारात कोणत्यातरी अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन अपघात करून त्यास गंभीर जखमी करून त्याचे मृत्यूस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता निघून गेला आहे या माहितीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एन.बी दहीफळे हे करत आहेत. तसेच याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल एन.बी.दहिफळे यांच्या 8668724747 या नंबर वर माहिती कळवावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.