२०१८ ला दुष्काळाच्या यादीतून आपल्या तालुक्याला का वगळले होते?हे अगोदर आपल्या नेत्यांना विचारा-मधुकर टेके

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
२०१८ ला कोपरगाव मतदार संघात दुष्काळ असतांनाही शेजारील तालुक्यांचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आला होता. मात्र कोपरगाव तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आला होता. मात्र तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प बसल्या होत्या.त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी आमरण उपोषण केल्यामुळे तालुक्यातील काही गावे दुष्काळग्रस्त जाहीर झाली होती हे जनता विसरलेली नाही.तुमच्या नाकर्तेपणामुळे नागरीकांना जिवंतपणी सरणावर बसण्याची वेळ आली होती. त्यांनी अतिवृष्टीच्या मदतीबाबत टीका-टिप्पणी करणे हास्यापद असून २०१८ ला आपल्या तालुक्याला दुष्काळाच्या यादीतून का वगळण्यात आले? हे अगोदर आपल्या नेत्याला जावून विचारा असा खोचक सवाल मा.पंचायत समिती सदस्य मधुकर टेके यांनी कोल्हे गटाला केला आहे.२०१९ पासून अनेक वेळा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्या-त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी स्वत: झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना देवून वेळोवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळवून दिली आहे. याहीवर्षी परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात मोठा धुमाकूळ घातला असून त्याचा फटका कोपरगाव मतदार संघाला देखील बसला आहे. अतिवृष्टी होत असतांना आ. आशुतोष काळे यांनी स्वत: भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करून महसूल आणि कृषी विभागाला झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहणार नाही अशा सक्त सूचना दिल्या होत्या.यावरच न थांबता आ.आशुतोष काळे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांची भेट घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरीकांना जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मागणी केली होती व तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी संदीप दळवी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून वेळेत अचूक पंचनामे करून तातडीने अहवाल शासनदरबारी सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पाठपुराव्यातून व आ.आशुतोष काळे यांनी पंचनाम्याबाबत दाखविलेल्या दक्षतेमुळे कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांचा अतिवृष्टी बाधित क्षेत्रात समावेश करण्यात आला. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३१.७० कोटीची नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आली असून हि नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचण येवू नये यासाठी केवायसीची अट रद्द करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे हे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना माहिती आहे.परंतु नेहमीच नागरिकांची दिशाभूल करण्याची सवय असलेल्या कोल्हेंना ज्या शेतकरी कार्यकर्त्याचे किती नुकसान झाले याची माहिती नाही त्या शेतकऱ्याच्या नावे प्रसिद्धी पत्रक देवून निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्वार्थ साधत असले तरी कोपरगावचे सुज्ञ नागरीक त्याला कधी भुलणार नाही असे मा.पंचायत समिती सदस्य मधुकर टेके यांनी शेवटी म्हटले आहे.



