करंजी परिसरात गुरुवारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस महामार्गावर झाडे पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी परिसरात आज गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तासभर चाललेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक नागरिकांच्या घरांचे तसेच जनावरे बांधण्याच्या शेडचे व पोल्ट्री फार्मचे तसेच ट्रॅक्टरवर झाड पडल्याने ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले तसेच साधारण या वादळी वाऱ्याने 350 च्या पुढे झाडे तुटून उन्मळून पडले तर काही घराचे पत्रे साधारण अर्धा किलोमीटर उडून गेले
यामध्ये दोन महिला जखमी झाल्याचे समजते या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले तर आज गुरुवारी अचानक आलेल्या वादळासह गारांच्या पावसाने करंजी नऊ चारी ते पढेगाव लहान पाटापर्यंत रस्त्यावर या तीन किलोमीटरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे तुटून पडल्यामुळे तर काही झाडे उन्मळून पडल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता तसेच करंजी गावाकडे जाणाऱ्या विद्युत प्रवाह वाहून नेणारे पोल व तारा तुटल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला आहे
तसेच करंजी परिसरातील इतिहासकालीन असलेले शंभर वर्षांपूर्वीचे झाड देखील या वादळी वाऱ्यासह व पावसामध्ये उन्मळून पडले त्यामुळे कोपरगाव कडून वैजापूर कडे जाणारी व वैजापूर कडून कोपरगाव कडे जाणारी वाहतू काही वेळा साठी ठप्प झाली होती त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना या पावसाने मोठा खोळंबा झाला होता. तर या वादळी वाऱ्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडांच्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात खाली पडल्या मुळे देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
याबाबत स्थानिक नागरिकांनी आमदार आशुतोष दादा काळे यांच्याशी संपर्क केल्यामुळे आमदार आशुतोष दादा काळे हे त्वरित करंजी गावात पोहोचून झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी त्वरित कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना संपर्क करून वळवाच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्याच्या सूचना दिल्याने संबंधित विभागाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून तसेच रस्त्यावर पडलेल्या झाडांची पाहणी करून त्वरित जेसीबीच्या साह्याने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू
करुन सदरचा महामार्ग प्रवासासाठी खुला करण्यात आला याबाबत आमदार आशुतोष दादा काळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या की शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित अहवाल शासनाला कळवावा म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळवूण देण्यासाठी मी स्वतः वरिष्ठांशी बोलून ती कामे मार्गी लावतो असे आशुतोष दादा काळे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.