कोपरगाव मध्ये बुद्ध धम्म प्रसारक मंडळाच्या वतीने २३ मे ला बुद्ध पौर्णिमेचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव शहरातील नगर मनमाड मार्गावर असलेल्या लुंबिनी उपवन बुद्ध विहार कविवर्य वामनदादा कर्डक मार्ग या ठिकाणी गुरुवार दिनांक २३ मे २०२४ रोजी भगवान बुद्ध पौर्णिमा सोहळ्याचे आयोजन पूज्यनिय भिक्खु संघाच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी सकाळी १०.३० ते ११.०० वाजता धम्म ध्वजारोहण व सामुहिक धम्म वंदना होईल त्यानंतर सकाळी ११.०० ते ११.३० वाजता अभिवादन त्रिशरण- पंचशिल व बुद्ध गुणांचे पठण व ग्रहण संपन्न होईल त्यानंतर ११.३० ते १२.०० या कालावधीत पूज्यनिय भिक्खु संघाचे भोजन होईल व त्यानंतर दुपारी १२.०० ते ०१.३० वाजेपर्यंत उपस्थित उपासकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे या बुद्ध पौर्णिमेनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष दादा काळे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे यांची अनमोल अशी उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे

तसेच उपस्थित सर्व उपासकांची भोजनाची व्यवस्था आयुष्यमती मंदाकिनी भास्करराव गंगावणे परिवाराने केली असून हा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रंभाजी रणशूर उपाध्यक्ष भीमराज गंगावणे सचिव रमेश हेगडमल तसेच वसंत गाडे अनिल पाईक सर नानासाहेब रणशूर मोतीराम शिंगाडे रमेश मोरे सर तुकाराम रणशूर प्रल्हाद जमधडे नाना रोकडे राहुल धिवर गोरख सोनवणे व विलास छगन गवळी आदी सह कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.