होमगार्डला वर्षभरात ३१२ दिवस काम द्या राष्ट्रीय बहुजन महासंघाचे आझाद मैदानात लाक्षणिक आंदोलन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्का साठी राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या अधिपत्याखाली मुंबई आझाद मैदान येथे एक दिवसीय ठिय्या आंदोलन नुकतेच करण्यात आले या वेळी होमगार्ड कर्मचारी गेली कित्येक वर्ष पोलीस प्रशासना बरोबर खांदयाला खांदा लावून प्रामाणिक पणे आपले कर्तव्य बजावत असून महाराष्ट्र राज्याचे प्रशासन मात्र गेली ७० ते ७५ वर्षापासून होमगार्ड कर्मचारी वर्गाचा कढीपत्त्या प्रमाणे उपयोग करीत आहे १२ महिन्या पैकी होमगार्ड कर्मचाऱ्यांची जेव्हा प्रशासनाला गरज भासेल त्या वेळी त्यांचा वापर करून घेते व गरज संपली की घरी पाठवते या शासनाच्या स्वार्थी धोरणा मुळे या कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय कर्तव्यावरून खाली येताच आपल्या कुटूंबाच्या उधरनिर्वाह करण्यासाठी पुन्हा कामाच्या शोधात निघावे लागते ही वारंवार होणारी पुनरावृत्ती कायमची थांबावी या साठी या कर्मचाऱ्यांना वर्षाच्या ३६५ दिवसापैकी ३१२ दिवस काम देणे हे शासनाचे कर्तव्य व जबाबदारी असुन देखील या कडे जाणीव पुर्वक राज्यकर्ते व प्रशासन दुर्लक्ष करित आहे. होमगार्ड कर्मचाऱ्यांन बाबत घेतलेली उदासिन भूमिका सोडुन या कर्मचारी वर्गाला वर्षातील साप्ताहीक सुट्टी वगळता ३१२ दिवस काम दया.व सुप्रीम कोर्टाच्या आदेशा नुसार त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला द्यावा.

अथवा होमगार्ड कर्मचारी वर्गाला काम असो किवा नसो त्यांना प्रती महिणा ३५.०००/- रुपये प्रमाणे ठोक मानधन देऊन त्यांची व त्यांचा कुटुंबियांची होणारी आर्थिक कुंचबना कायम स्वरूपी दूर करून त्यांना आर्थिक न्याय द्यावा. त्यामुळे होमगार्डला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण योग्यरित्या करता येईल तसेच होमगार्डच्या कुटुंबाचा सामाजिक,अर्थिक स्थर वाढला पाहीजे ही संकल्पना प्रशासनाने सरकारी दरबारी संविधानिक मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबून आपल्या मागण्या प्रशासना दरबारी ठेवल्या होत्या, पण त्या योग्य असणाऱ्या मागण्या विचारात न घेता आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी होमगार्ड सेवेतून मुक्त केले हे कृत्य व कार्य करून प्रशासनाने या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे.ज्या अंदोलकांना आंदोलनाच्या धरतीवरून होमगार्ड सेवेतून मुक्त केले आहे त्यांना फेर सेवेत सामावून घ्या. त्याच प्रमाणे प्रत्येक ३ वर्षांनी होमगार्ड कर्मचारी वर्गाला फेर प्रमाणपत्र देऊन त्यांना सेवेत समाविष्ट केल्याचे प्रमाणपत्र दिले जाते, या प्रक्रियेत बदल करून भरती प्रक्रीयेच्या वेळी सेवेत रुजू झाल्याचे नियृक्ती पत्र देवून कायदया अनुसार सेवा समाप्ती पर्यंतचे नियृक्ती प्रमाणपत्र होमगार्ड कर्मचारी वर्गाला देवून कायदयाच्या चौकटीत घ्या. व सन २००५ आधी जे होमगार्ड कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहेत, त्यांना भविष्य निर्वाह निधी अथवा इतर कोणती ही रक्कम त्यांच्या पुढील जिवन काळ व्यथित करण्यासाठी मिळावा तसेच ज्यांनी प्रामाणिक पणे आपले कर्तव्य व सेवा शासन दरबारी पारपाडली आहे त्यांना आज ही परावलंबी जीवन जगण्याची वेळ शासनाने त्यांना विचारात घेतले नसल्याने त्यांच्यावर आली असून त्यांनी केलेले कामाच्या आराखाड्यची, सेवेची तपासणी करून त्यांना स्वावलंबी जीवन जगण्या साठी २००५ सालीच्या आधीच्या

सेवा निवृत होमगार्ड कर्मचारी वर्गाला प्रत्येकी दहा लाख रुपयाच्या प्रमाणात रक्कम दया व होमगार्ड अधिनियम १९४७ या कायदयात होमगार्ड कर्मचारी वर्गाला हि सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक व स्वतंत्र्यचा हक्क असणे हे भारतीय राज्यघटने अनुसार गरजेचे आहे. यासाठी होमगार्ड अधिनियम १९४७ या अधिनियमात सुधारणा करावा या न्याय हक्काच्या मागण्यांना राज्य शासनाने स्वीकृती देऊन होमगार्ड कर्मचार्यांना न्याय द्यावा या मागण्या साठी एकदिवसीय ठिय्या आंदोलन घेण्यात आले या आंदोलनाच्या अनुषंगाने शासनाच्या अधिकारी वर्गा बरोबर झालेल्या बैठकित समाधान कारक उत्तरे मिळाली नसल्याने संघटनेने पुणे ते मुंबई मंत्रालय पदयात्रा काढण्याचा निर्यण घेतला असुन त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे संघटनेच्या वतीने सांगीतले आहे.या आंदोलानस राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजीव सोरटे दादा
प्रदेशाध्यक्ष प्रदिपसिंह माने, प्रवक्ते दयानंद शिवजातक,सुनिता भोसले,सुनील होळकर,रविंद्र अष्टेकर,पुष्पा नाईकवाडे,भारती करोडि
,माधुरी शहा,पुरे मॅडम,जिजा थोरात,अशोक पोळ यांनी विशेष सहकार्य करुन राज्यातील बरेच महिला व पुरुष होमगार्ड यांनी उपस्थित राहुन आंदोलन यशस्वी केले असून पुढची भूमिका संघटना लवकरच हाती घेणार असून जोपर्यंत होमगार्ड यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही अशी ग्वाही संघटनेचे अध्यक्ष राजीव सोरटे दादा यांनी सांगितले.