भारतीय बौध्द महासभेच्या वतीने शिर्डी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हा अहिल्यानगर उत्तर विभागाच्या वतीने शिर्डी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन बुधवार दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता करण्यात आले आहे यावेळी शिर्डी येथील बौध्द विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन पूजनीय भंन्ते काश्यप वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा वैशाली अहिरे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड.अनिल शेजवळ आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्प पूजन दिप पूजन व धूप पूजन संपन्न करून भंन्ते काश्यप यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले त्यानंतर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी जन आक्रोश मोर्चा बाबत उपस्थितांना संस्थेच्या ध्येय धोरणे व अजिंठ्या बाबत माहिती दिली तसेच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी जन आक्रोश मोर्चातील प्रमुख तीन मागण्यांची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बुद्ध विहारा पासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा ! सभी मानव एक समान यही बौध्द धम्म की पहचान ! जग मे बुध्द का नाम है यही भारत की शान है ! खाली करो खाली करो हमारा महाबोधी विहार खाली करो ! महाबोधी विहार ब्राह्मण मुक्त झालेच पाहिजे अशा आशयाच्या घोषणा देत सदरच्या मोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी उत्कर्षा रुपवते,शांताराम रणशूर, जितेंद्र रणशूर,यांनी बौध्द गया येथील महाबोधी बुध्द विहार बौध्दांच्या ताब्यात मिळावे तसेच महू येथील भीम जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन भारतीय बौध्द महासभेकडे द्यावे तसेच नागपूर येथील दिक्षाभूमीचे व्यवस्थापन भारतीय बौध्द महासभेकडे द्यावे या प्रमुख मागण्यां बाबत केंद्र सरकारने याबाबत हस्तक्षेप करून मनोवाद्यांच्या ताब्यात असलेले बौध्दविहारे बौध्दांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली तसेच आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलने करत आहोत मात्र याची केंद्राने दखल घ्यावी अन्यथा हा बौद्ध समाज रस्त्यावर उतरल्यावर होणाऱ्या परिणामाला केंद्र सरकार जबाबदार राहील असेही सरकारला सुनावले आहे तेव्हा केंद्र सरकारने लवकरात लवकर तातडीने पावले उचलून बौध्दांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली यावेळी भारतीय बौध्द महासभेच्या अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा वैशाली अहिरे तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी त्याचप्रमाणे कोपरगाव संगमनेर अकोला राहता श्रीरामपूर तालुका व शहर कमिटीचे सर्व पदाधिकारी समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी तसेच उपासक व उपासिका याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक व कोपरगाव प्रभारी बिपीन गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी मानले.