जि.प.शहापूर शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नितीन घारे तर उपाध्यक्षपदी अभिजीत पाचोरे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नितीन भाऊसाहेब घारे तर उपाध्यक्षपदी अभिजीत बाबासाहेब पाचोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की शहापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नुकतेच पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी भारत पाचोरे पोपट डांगे दत्तात्रय पाचोरे अमोल सदाफळ अभिजीत पाचोरे नितीन घारे पवन डांगे कृष्णा सदाफळ बापू डांगे शाळेचे मुख्याध्यापक दिघे सर,

सोनवणे मॅडम यांच्यासह शिक्षक व पालक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थित पालकांनी एक मताने अध्यक्ष पदासाठी नितीन भाऊसाहेब घारे तर उपाध्यक्ष पदासाठी अभिजीत बाबासाहेब पाचोरे यांचे नाव जाहीर केल्यामुळे सदरची निवडणूक ही बिनविरोध करण्यात आली यावेळी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका तसेच पालक वृंद याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.