कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कौन्सिल हॉलमध्ये या विभागाच्या मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली यावेळी सरकारी पक्षाचे सर्व अधिकारी तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील याप्रसंगी उपस्थित होते

यादरम्यान कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग साठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. मागील काही दिवसापूर्वी माननीय सुप्रीम कोर्टाने जानेवारी महिना संपण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची निर्देश राज्य सरकारला दिले होते त्यानंतर प्रशासनाने वेगाने तयारी सुरू करून आरक्षणाची सोडत काढण्यात आली असून त्यामुळे कोपरगाव शहरातील नगराध्यक्ष पदासाठी काही

दावेदारांची मोठी रस्सीखेच गुप्तपणे सुरू होतीअखेर त्याला विराम मिळाला असून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जे पदाधिकारी नगराध्यक्ष पदाच्या रेस मध्ये होते त्यांच्यासाठी मैदान मोकळे झाले

असून आता जाहीर झालेल्या आरक्षणामुळे कोणत्या राजकीय पक्षाला याचा फायदा किंवा तोटा होईल हे आता काही दिवसातच जनसामान्यांसमोर येईल तेव्हा होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मोर्चे बांधणीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.