भाजपा आर.पी.आय लोकसेवा आघाडीचे उमेदवार उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकसेवा आघाडी कोपरगाव यांच्या सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी भरला जाणार आहे. तेव्हा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संधान पराग शिवाजी व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांचे अर्ज मोठ्या जल्लोषात दाखल केले जाणार आहे.तसेच कोपरगाव शहराला सातत्याने भेडसावत असणाऱ्या समस्या या सुटण्यासाठी सक्षम आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे नेतृत्व गरजेचे आहे. रस्ते पाणी आरोग्य स्वच्छता या समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यामध्ये पालिका प्रशासन आणि आमदार हे कमकुवत ठरले आहे. चार वर्षापासून प्रशासक असताना सर्वाधिकार आमदारांकडे होते मात्र शहरात समस्यांचा महापूर दिवसेंदिवस वाढत राहिला. यावर ठोस काम करणारे नेतृत्व म्हणून नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान आणि त्यांच्या समवेत नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करून प्रचाराची रंगत येणार आहे. यावेळी सकाळी १० वाजता पदयात्रा निघणार असून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे स्मारक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, विघ्नेश्वर मंदिर, दत्त मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दाखल करण्यासाठी जाणार आहेत.




