Breaking
संजीवनी उद्योग समूह

विवेकभैय्या कोल्हे यांच्या व्हिजनरी नेतृत्वावर प्रभावित होत दडीयाल यांचा भाजपा प्रवेश

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगावमध्ये एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली असून, ठाकरे गट शिवसेनेचे माजी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल आणि गुरमितसिंग दडीयाल यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. मा.आ.स्नेहलताताई कोल्हे आणि भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते रविकाका बोरावके, हरिभाऊ गिरमे, कैलास खैरे, नरेंद्र डंबीर, नसीरभाई सय्यद,विनोद राक्षे,सुशांत खैरे,नितीन वानखेडे,हुसेन सय्यद आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि विकासाभिमुख राजकारणासाठी स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या व्हिजनरी नेतृत्वावर विश्वास ठेवून दडीयाल बंधूंसह कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. विवेकभैय्या यांनी अल्पावधीतच सेवा आणि स्वच्छ राजकारणाचा ठसा उमटवला असून, त्यांच्याभोवती वाढणारा जनसमर्थनाचा उंचावलेला आलेख आजच्या प्रवेशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.दुसरीकडे, केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या काका कोयटेंच्या आणि आमदार काळे यांच्या मनसुब्यांना युवानेते विवेकभैय्यांनी एकाच दिवसात सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे. कोपरगावच्या भविष्याकडे पाहताना, स्वच्छ नेतृत्व आणि पारदर्शकतेवर आधारित राजकारणाची जनतेची अपेक्षा वाढत असताना, आजचा प्रवेश हा शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारा ठरला आहे.भारतीय जनता पार्टीच्या सबका साथ, सबका विकास या तत्वज्ञानावर विश्वास ठेवत दडीयाल बंधूंनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.यासह लवकरच यापेक्षाही मोठा धमाका होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »